बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी ८ जुलै रोजी त्यांचा ६४वा वाढदिवस साजरा केला. नीतू कपूरने त्यांचा वाढदिवस कपूर कुटुंबासोबत न्यूयॉर्कमध्ये साजरा केला. नीतू कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नीतू कपूरचा मुलगा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सून आलिया भट्ट (Alia Bhatt) या सेलिब्रेशनचा भाग होऊ शकले नाहीत. दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते, पण त्यांनी नीतूसाठी एक खास भेट पाठवली होती, ज्याचा फोटो नीतू कपूरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नीतू कपूरने त्यांचा खास दिवस मुलगी रिद्धिमा आणि कपूर कुटुंबियांसोबत लंडनमध्ये साजरा केला. लंडनमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेलेल्या करीना कपूर, करिश्मा कपूर आणि सैफ अली खान यांचीही त्यांनी लंडनमध्ये भेट घेतली. नीतू कपूरच्या वाढदिवसानिमित्त खास लंचचे आयोजन करण्यात आले होते. हा फोटो सर्वांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (ranbir kapoor and alia bhatt send special gift to neetu kapoor)
आलिया-रणबीरने पाठवले खास गिफ्ट
नीतू कपूरने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गिफ्टचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये फुलांचा गुच्छ आणि आलिया-रणबीरच्या बाजूने लिहिलेली चिठ्ठी दिसत आहे. चिठ्ठीत लिहिले आहे, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुझ्यावर खूप प्रेम आहे.” तसेच, भेटवस्तूचा फोटो शेअर करताना नीतू यांनी लिहिले की, “धन्यवाद आलिया आणि राणा.” यासोबतच त्यांनी हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत वाणी कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर आलियाने तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नीतू कपूरचा ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट सिनेमागृहात रिलीझ झाला आहे. या चित्रपटाने अनेक आठवडे बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत वरुण धवन, अनिल कपूर आणि कियारा अडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा