Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड कसं शक्य आहे? रनबीर-आलियाचं लग्न एकाच दिवशी मुंबईत पण झालं आणि कोलकात्यातही

कसं शक्य आहे? रनबीर-आलियाचं लग्न एकाच दिवशी मुंबईत पण झालं आणि कोलकात्यातही

बॉलिवूड जगतात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt)  शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लग्नातील रणबीर आलियाचे, लग्नात उपस्थित असलेल्या अनेक दिग्गज कलाकारांचे फोटो समोर येत आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर काही व्हायरल फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. हे फोटो रणबीर आलियाच्या एका चाहत्याने कोलकत्यातुन शेअर केले असून ज्यामध्ये रणवीर आलियाचा विवाह सोहळा पार पडत असल्याचे दिसत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

हिंदी चित्रपट कलाकार आणि त्यांच्यासाठी वेडे असलेले चाहते याबद्दलचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यांच्या लाडक्या हिरोची एक झलक पाहायला हे चाहते काहीही करायला तयार असतात. सध्या रणबीर आलियाच्याही अशाच एका भन्नाट चाहत्याची करामत समोर आली आहे. ज्याने आलिया आणि रणबीरची प्रतिकृती बनवत त्यांच्या आकाराचे बाहुले बनवत त्याला वधु वराचा पोशाख चढवला आहे. इतकेच नव्हेतर या बाहुल्यांना त्याने रणबीर आणि आलियाचे पोस्टरही लावले आहेत. हा चाहता कोलकात्याचा असल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या लाडक्या कलाकारांच्या लग्नाला जाता येत नसल्याने या तरुणाने लढवलेली शक्कल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

दरम्यान रणबीर आणि आलियाच्या प्रेमप्रकरणाची अनेक महिन्यांपासून सर्वत्र चर्चा रंगली होती. आता त्यांच्या या लवस्टोरीचा लग्नाने गोड शेवट झाल्याने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. चित्रपट जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी लग्नात प्रत्यक्ष उपस्थित राहून तर काही जणांनी सोशल मीडियावरुन वधूवराला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या आर.के स्टुडिओमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. कपूर आणि भट्ट कुटूंबातील सगळ्या सदस्यांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा