‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची खूप पसंती मिळाली होती. करण जोहरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच यामध्ये अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही सीनमुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) या चित्रपटाला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट २८ ऑक्टोब, २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. ५ वर्षांनंतर देखील या चित्रपटाची चर्चा काही किस्स्यांमुळे कायम आहे. त्यातीलच काही किस्से जाणून घेऊ.
करण जोहरला चित्रपटासाठी दिला होता ऐश्वर्याने नकार
ऐश्वर्या राय तिच्या मुलीला म्हणजेच आराध्या बच्चनला जन्म दिल्यानंतर सिनेसृष्टीत पुनरागमन करणार होती. अशात सुरुवातीला तिने ‘जज्बा’ आणि ‘साबरमती’ चित्रपटात अभिनय केला होता. मात्र, नंतर प्रेक्षकांनी ते चित्रपट नाकारले. त्यानंतर करणने तिला ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटासाठी ऑफर दिली. तसेच ‘यामध्ये तुला किस सीन करावे लागतील,’ असेही त्याने सांगितले. आता प्रश्न होता बच्चन कुटुंबाच्या इज्जतीचा. त्यामुळे तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिने यासाठी नकार दिला. मात्र, नंतर करणने तिला समजवले आणि सांगितले की, ‘हे सीन पाहणाऱ्यांना खूप छान वाटतील आणि तुझ्या आणि बच्चन कुटुंबाच्या इज्जतीवर कोणीही प्रश्न उपस्थित होणार नाहीत.’ त्यानंतर ती हा चित्रपट करण्यास तयार झाली. तसेच बच्चन कुटुंबीयांना देखील चित्रपटातील सुनेचा अभिनय फार आवडला.
ऐश्वर्याच्या गालाला हात लावायला घाबरत होता रणबीर
रणबीर कपूर सिनेसृष्टीचे वातावरण असलेल्या घरामध्येच लहानाचा मोठा झाला आहे. मात्र, तरीदेखील ऐश्वर्याबरोबर त्याला किसिंग सीन आणि बोल्ड सीन करताना घाम फुटत होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, “ऐश्वर्याबरोबर बोल्ड सीन करताना मी खूप घाबरलो होतो. माझे हात- पाय थरथरत होते. मला तिच्याबरोबर असे सीन करताच येत नव्हते. त्यांनतर तिने माझी समजूत काढली आणि मला योग्य सीन द्यायला सांगितले. मग काय मी पण म्हणालो, आलेली संधी साधून घेऊ आणि मग ते सीन चांगले झाले.” चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या दोघांमधील केमेस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. ऐश्वर्या रणबीरपेक्षा ९ वर्षे मोठी असून देखील तिचे वय जास्त असल्याचे समजत नव्हते.
रणबीरला आला होता अनुष्काचा राग
रणबीर आणि अनुष्कामधील मैत्री आणि प्रेमाचे नाते दिग्दर्शकांना समोर आणायचे होते. एकदा शूट करत असताना रणबीरला अनुष्का कानामागे मारते असा सीन सुरू होता. त्यावेळी अनुष्काने सीन चांगला व्हावा म्हणून जोरदार रणबीरच्या कानामागे लावली होती. त्यावेळी रणबीर पुरता गडबडला होता. तसेच त्याला अनुष्काचा राग देखील आला होता. एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला होता की, “अनुष्का कमालीची अभिनेत्री आहे. ती फक्त सीन उत्तम झाला पाहिजे हाच विचार करते.”
अनुष्का, रणबीर आणि ऐश्वर्या हे तिघे खूप चांगले मित्र आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो
-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण