Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड रणबीर कपूरला मुलगी राहाच्या जन्माआधी दिला गेला होता ‘हा’ अजब सल्ला, खुद्द त्यानेच केला खुलासा

रणबीर कपूरला मुलगी राहाच्या जन्माआधी दिला गेला होता ‘हा’ अजब सल्ला, खुद्द त्यानेच केला खुलासा

सध्या अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेमामुळे तुफान गाजत आहे. लवकरच त्याचा हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी तो विविध ठिकाणी सतत दिसत असतो. होळीच्या पार्श्वभूमीवर ‘तू झूठी मैं मक्कार’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 2022 हे वर्ष खूपच मस्त गेले. त्याच्या ब्रह्मास्त्र सिनेमा प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला, सोबतच याचवर्षी त्याने आलिया भट्टसोबत लग्न केले आणि तो एका मुलीचा बाबा देखील झाला.

मागच्यावर्षी रणबीर कपूरने मुलगी राहा च्या जन्माआधी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वडील होण्याच्या दृष्टीने चालू असलेल्या तयारीवर काही मजेशीर खुलासे केले होते. या मुलाखतीमध्ये त्याला विचारले गेले की वडील होण्याआधी तो त्याच्या घराण्याच्या वारसाबाबत काय विचार करत आहे? याचे उत्तर देताना त्याने सांगितले की, याबद्दल विचार करण्यासाठी तो अजून तरुण आहे. सामान्यपणे याचा विचार म्हातारे झाल्यावर केला जातो. यासोबतच रणबीरने एक किस्सा देखील सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

रणबीर कपूर म्हणाला की, राहाच्या जन्माआधी त्याला त्याच्या सीएने विचारले होते की, त्याला त्याचे मृत्यपत्र बनवायचे आहे का? हे ऐकून त्याला जरा धक्काच बसला होता. यावर तो म्हणाला की तो आता का ते बनवेल. यासोबतच मुलाखतीमध्ये तो पुढे म्हणाला की, यासर्व गोष्टींची त्याला आतापासून चिंता करायची नाही. आता तो फक्त त्याच्या मुलीसोबतचा वेळ एन्जॉय करणार असून, प्रत्येक दिवस आनंदाने तिच्यासोबत त्याला घालवायचा आहे.

रणबीर कपूरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच लव रंजनच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेमात दिसणार आहे. यात तो पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत काम करताना दिसेल. त्यांच्यासोबत यात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

हे देखील वाचा