Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड आलिया भट्टच्या ‘अशा’ वागण्याने कंटाळलाय रणबीर कपूर, थेट ‘या’ व्यक्तीकडे केली तक्रार

आलिया भट्टच्या ‘अशा’ वागण्याने कंटाळलाय रणबीर कपूर, थेट ‘या’ व्यक्तीकडे केली तक्रार

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असते. दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेकवेळा दोघे सोबत फिरताना दिसतात. दोघांच्याही जोडीचे कौतुक केले जाते. मात्र आता रणबीर कपूरने आलिया भट्टची एक तक्रार थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्याकडे केली आहे. काय आहे ही तक्रार चला जाणून घेऊ.

सध्या चित्रपटसृष्टीत सर्वत्र संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती म्हणजे चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आलिया भट्टची. आलियाच्या डॅशिंग आणि बिंनधास्त लूकवर सगळेच फिदा झालेले पाहायला मिळत आहेत. नुकताच बर्लिन आंतरराष्टीय चित्रपट महोत्सव साजरा करण्यात आला.

या महोत्सवात ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचे खास स्क्रीनींग ठेवण्यात आले होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आलिया भट्टचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. संजय लीला भन्साळी म्हणाले की, “चित्रपटात जशी आलियाची डॅशिंग इमेज दाखवण्यात आली आहे. तशीच ती घरात सुद्धा असते आणि ही तक्रार खुद्द रणबीर कपूरने केली आहे. रणबीरने मला सांगितले की ती घरात सुद्धा अशीच राहायला लागलीये. सगळ्यांना दम द्यायला लागलीये.” संजय लीला भन्साळी यांच्या या खुलाशाने सगळेच हसायला लागले होते.

मात्र ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील भूमिकेसाठी आत्ता कौतुक होत असलेली आलिया, पहिल्यांदा मात्र ट्रोल झाली होती. यामधील भूमिका दुसर्‍या एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला दिली असती तर चांगली वाटली असती, असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. मात्र त्याकाळात गंगुबाईचे वय ३० होते, त्यामुळे मोठी अभिनेत्री दाखवू शकत नाही असा खुलासा आलियाने केला होता. हा बहुचर्चित चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा

हेही पाहा-

हे देखील वाचा