Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड तर ‘हे’ कारण आहे रणबीर कपूरच्या सोशल मीडियावर नसण्याचे, अभिनेत्याने स्वतःच केला कारणाचा खुलासा

तर ‘हे’ कारण आहे रणबीर कपूरच्या सोशल मीडियावर नसण्याचे, अभिनेत्याने स्वतःच केला कारणाचा खुलासा

सध्या मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर सतत लाइमलाईट्मधे आहे. तो त्याच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी सतत मुलाखती देत असून सिनेमाला जोरदार विविध ठिकाणी प्रमोट करताना दिसत आहे. मात्र सोशल मीडियावर अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘तू झूठी मैं मक्कार’चे प्रमोशन करत आहे. कारण रणबीर कपूर सोशल मीडियावर नसून त्याला सोशल मीडियापासून लांब राहणे आवडते. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीमध्ये त्याला याच संदर्भात प्रश्न विचारला गेला होता. 

ranbir k
photo courtesy:Instagram/aliaabhatt

रणबीर कपूरची बायको असलेली अभिनेत्री आलिया भट्ट इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सर्वच प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. मात्र रणबीर का सोशल मीडियापासून लांब आहे? याबाबत आता त्यानेच खुलासा केला आहे. रणबीर म्हणाला, “जर एखादा कलाकार सोशल मीडियावर आहे तर त्याला स्वतःला एका विशिष्ट पद्धतीने लोकांसमोर सादर होता आले पाहिजे, किंबहुना तसे करावे लागते. तेव्हाच नेटकऱ्यांसोबत कलाकारांचा ताळमेळ बसतो. जर कोणी सोशल मीडियावर असेल तर त्याला मनोरंजनक पद्धतीने स्वतःला दाखवावे लागते मी तसा नाहीये.”

पुढे रणबीर म्हणाला, “मला नेहमीच असे वाटते की, आजच्या काळात एका अभिनेत्याची आणि अभिनेत्रीची जी एक मिस्त्री आहे, ती कुठे ना कुठे जात आहे. आपण एवढ्या जाहिराती करतो, चित्रपट करतो, प्रमोशन करतो, शो करतो यामुळे आपण सतत लोकांसमोर दिसतो. सोशल मीडियावर देखील आपणच दिसणार यामुळे. लोकं आता आपल्यला कंटाळून गेले आहेत. ते म्हणतात कोणता नवा अभिनेता आणा रे आता.”

Ranbir-Kapoor
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/Dharma Productions

सोशल मीडियापासून लांब राहण्याचे रणबीर कपूरने काही फायदे देखील सांगितले. तो म्हणाला, “मी नेहमीच प्रयत्न करतो की, माझे खासगी आयुष्य लोकांपासून वाचवू शकेल. कारण जेव्हा माझा सिनेमा येईल तेव्हा लोकं विचार करतील, की अरे खूप दिवसांनी याच सिनेमा येत आहे. चला बघून तर येऊ” दरम्यान रणबीर कपूरच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर या सिनेमात तो श्रद्धा कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. हा सिनेमा येत्या ८ मार्च प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चिनीकम’ फेम अभिनेत्री स्विनी खाराचा साखरपुडा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती
टायगर श्रॉफला करायचे आहे हॉलिवूडमध्ये काम, म्हणाला मी’ अनेकवेळा ऑडिशन दिलेत पण…’

हे देखील वाचा