Saturday, July 6, 2024

बाबो! शुटिंगनंतर २० वेळा अंघोळ करावी लागायची, रणबीर कपूरने सांगितला ‘शमशेरा’च्या शुटिंग दरम्यानचा किस्सा

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या शरशेरा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या आगामी चित्रपटाची तो जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अलिकडेच अभिनेत्री आलिया भट्टने आई होणार असल्याची गुड न्यूज देऊन सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. त्यानंतर अभिनेता रणबीर कपूरनेही बाबा होणार असल्याच्या आनंदात अनेक गोष्टींचा उलघडा केला होता. सध्या रणबीर आपल्या आगामी शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान तो चित्रपटाच्या शूटिंगवेळचे अनेक किस्से चाहत्यांना सांगताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान ‘शमशेरा’ चित्रपटाविषयी सांगितले. या चित्रपटातील भूमिकेच्या तयारीबाबत अभिनेते म्हणाले की, शूटिंगदरम्यान त्याच्यावर दहा ते पंधरा किलो धूळ फेकण्यात आली होती. यासोबतच त्याने हे देखील सांगितले की, शूटिंग केल्यानंतर त्याला किमान 20 वेळा आंघोळ करावी लागली होती.

या बद्दल बोलताना रणबीर म्हणाला की,  “सर्वप्रथम, जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता, कारण मी पडद्यावर बहुतांश रोमँटिक हिरोची भूमिका केली आहे. या चित्रपटात दुहेरी भूमिका करणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे, कारण असे चित्रपट मला कधीच ऑफर झाले नाहीत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रोज दहा ते पंधरा किलो धूळ ठेवली जायची. मग शूटिंग सुरू होताच तो पंख्यासमोर धूळ उडवत असे. मग ती धूळ आणि माती डोळ्यात, कानात जायची आणि त्यामुळे आम्ही संवाद बोलू शकलो नाही. त्यानंतर घरी गेल्यावर किमान वीस वेळा आंघोळ करावी लागली, तरीही अंगातून धूळ निघाली नाही,”

रणबीरच्या कर्व्ह फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या आगामी ‘शमशेरा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चाहत्यांनाही चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला आहे. हा चित्रपट 22 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. लवकरच रणबीर ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्याशिवाय त्याची पत्नी आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय देखील दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सर्वांशिवाय रणबीर रश्मिका मंदान्नाच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा