‘रामायण’ हा या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शिक नितेश तिवारी हे आहेत. तर चित्रपटांबाबत छोटी आतुरता संपेल कारण चित्रपटाचे निर्माते आज, 2 एप्रिल रोजी म्हणजेच हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ‘रामा’ नावाने चित्रपटाची पहिली झलक अधिकृतपणे प्रदर्शित केली आहेत. तर गेल्या आठवड्यात ‘रामायण’ चित्रपटाचा विशेष प्रिव्ह्यू सादर करण्यात आला होता.
रामायण या चित्रपटाची तुलना ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’ आणि ‘अवतार’ यांसारख्या जागतिक स्तरावरील भव्य चित्रपटांशी केली जात आहे. निर्माता नमित मल्होत्रा यांच्या भव्य दृष्टिकोनाचा आधार असलेला हा महाकाव्य चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटाचे बजेट 4000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
निर्मात्यांनी आता प्रभू रामाची पहिली झलक प्रदर्शित केली असून, चाहत्यांना चित्रपटाच्या भव्यतेची आणि दृश्यात्मक वैभवाची एक झलक दिली आहे. टीझरमध्ये रणबीर कपूर रामाच्या (ram)भूमिकेत पूर्णपणे रमलेला दिसतो. या दृश्यांमध्ये त्यांचा राज्याभिषेक, वनवास, वनातील संघर्ष, सीतेचे अपहरण आणि रावणाची झलक यांसारखे महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले आहेत. रणबीरचा लूक स्पष्टपणे समोर आला असला तरी, साई पल्लवी आणि यश यांचा लुक आजुनही समोर आला नाही.
या चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत असणार आहेत. तर या चित्रपटात संगीताचे काम ए. आर. रहमान यांनी दिग्गज संगीतकार हॅन्स झिमर यांच्यासोबत केले आहे. तर चित्रपट 2026 मध्ये दिवाळीच्या वेळी प्रदर्शित होईल. तर याचा दुसरा चित्रपट 2027 मध्ये येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मोहनलाल आणि ममूटी यांच्या ‘पॅट्रियट’ची रिलीज पुढे ढकलली, आता या तारखेला होणार प्रदर्शित










