Sunday, April 14, 2024

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्ताळलेल्या अवस्थेत दिसला आलियाचा रणबीर, ‘या’ सिनेमाचे पोस्टर रिलीज

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याने 2022मध्ये चढ-उतार पाहिले. त्याचे दोन सिनेमे मागील वर्षी रिलीज झाले. त्यातील ‘शमशेरा’ चांगलाच आपटला, तर ‘ब्रह्मास्त्र’ने बक्कळ कमाई केली. अशात त्याने नवीन वर्षानिमित्त चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. त्याचा ‘ऍनिमल’ फर्स्ट लूक समोर आला आहे. म्हणजेच, ‘ऍनिमल’ सिनेमाच्या निर्मात्यांनी रात्री 12 वाजताच या सिनेमाचा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणबीरला भयानक रूपात पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. तो रक्ताळलेल्या अवस्थेत असून त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत.

ऍनिमल फर्स्ट लूक
‘ऍनिमल’ (Animal) सिनेमातील अभिनेता रणबीर कपूरचा फर्स्ट लूक (Ranbir Kapoor First Look) पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सिनेमात रणबीरसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर टी-सीरिजच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये रणबीरचा एका बाजूचा चेहरा दिसत आहे. तो या फोटोत रक्ताळलेल्या अवस्थेत असून त्याच्या हातात एक कुऱ्हाड आहे आणि त्यावर रक्त लागले आहे. पोस्टर शेअर करत टी-सीरिजने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “2023मध्ये तयार आहे. हे ‘ऍनिमल’चे वर्ष आहे.”

रक्ताने माखलेला दिसला रणबीर
हे पोस्टर अभिनेत्री रश्मिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. यासोबतच तिने लिहिले आहे की, “ऍनिमलचा फर्स्ट लूक (Animal First Look) समोर आला आहे. मी खूपच उत्साही आहे. तुम्हीही पाहा.” खरं तर हा सिनेमा 11 ऑगस्ट, 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सीन’ सिनेमाशी रुपेरी पडद्यावर टक्कर होईल. हा सिनेमा स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्याचे अग्निहोत्रींनी सांगितले आहे.

Rashmika-Mandanna-Story
Photo Courtesy: Instagram/rashmika_mandanna

कधी होणार रिलीज
‘ऍनिमल’ सिनेमात रणबीर कपूर याच्याव्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा सिनेमा 5 भाषांमध्ये रिलीज होईल. सोशल मीडियावर या सिनेमाच्या पोस्टरला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींना हे पोस्टर आवडले आहे, तर काहींनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. अशात हा सिनेमात रुपेरी पडद्यावर काय कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ranbir kapoor’s first look poster out from movie animal actor seen soaked in blood)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा विद्या बालनला भिकारी समजून एका व्यक्तीने हातात ठेवले सुट्टे पैसे; काही काम धाम करण्याचाही दिला होता सल्ला

स्वत:च्याच शरीराचा तिरस्कार करायची विद्या बालन, अडल्ट भूमिका साकारून रंगवल्या चर्चा

हे देखील वाचा