Monday, July 1, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत झळकणार रणदीप हुड्डा, लूक पाहून चाहते हैराण

रणदीप हुड्डा (Randeep Hudda) असा स्टार आहे जो प्रत्येक चित्रपटात आपले सर्वोत्तम देण्यासाठी ओळखला जातो. ‘सरबजीत’मधील आपल्या दमदार अभिनयानंतर तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या तो त्याच्या आगामी स्वातंत्रवीर सावरकर (भारताचा बायोपिक मॅन) या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. ज्यासाठी तो त्याच्या लूक आणि वजनावरही खूप मेहनत घेत आहे. अलीकडेच, त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि आपल्या जबरदस्त परिवर्तनाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

हे चित्र पाहता रणदीप हुड्डा त्याच्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करत असल्याचे दिसते. गुरुवारी, अभिनेत्याने सोशल मीडियावर एक मिरर सेल्फी शेअर केला, ज्यामध्ये तो त्याच्या शरीराची चमक दाखवताना दिसत आहे. यावेळी रणदीपने काळ्या सँडोसोबत निळा पायजमा घातला होता. यासोबतच त्यांनी टोपी आणि गॉगलही घातला होता.

फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपल्या सर्वांना कधी ना कधी लिफ्टची गरज असते.” मात्र, या फोटोत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे त्याच्या वजनाने. रणदीपने कमी केलेल्या वजनावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केली आहे. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि अभिनेत्याच्या मेहनतीचे कौतुक केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

या चित्रपटासाठी रणदीपने 15 किलो वजन कमी केल्याची बातमी आधी आली होती. पण, आता असे सांगण्यात येत आहे की, अभिनेत्याने त्याच्या भूमिकेसाठी जवळपास 10 किलो वजन कमी केले आहे. म्हणजेच रणदीपने त्याच्या आगामी चित्रपटासाठी एकूण 25 किलो वजन कमी केले आहे. याआधीही ‘सरबजीत’साठी अभिनेत्याने वजन कमी केले होते. या चित्रपटाची रणदीपच्या चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा – प्रियांका चोप्रासोबत काम करून अर्जुन बाजवाला मिळाली ओळख, तरीही करिअर झाले फ्लॉप
महाराष्ट्राच्या विनोदवीराला चाहत्याकडून सुंदर गिफ्ट, थेट विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन…
आगामी चित्रपटासाठी रणदीप हूड्डाने केले तब्बल २५ किलो वजन कमी, पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हे देखील वाचा