Saturday, June 29, 2024

शब्दाला जागला रणदीप हुड्डा! वचन पूर्ण करत दिली सरबजीतच्या बहिणीला मुखाग्नी

सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर यांचे रविवारी (२६ जून) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दलबीर कौर यांच्या निधनाची बातमी समजताच ‘सरबजीत’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा रणदीप हुड्डा (Randeep Hooda) अंत्यसंस्कार करण्यासाठी तात्काळ मुंबईहून रवाना झाला. खरं तर, अनेक वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या सरबजीतच्या भूमिकेत रणदीप हुड्डा दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने प्रभावित होऊन दलबीरने रणदीपलाच आपला भाऊ मानले.

रणदीप आणि दलबीर या दोघांचे एकत्र बॉन्ड चांगला होते. दोघांचे हे भावा-बहिणीचे नाते इतके पवित्र होते की, दलबीरने त्यांचा मृत्यू झाल्यावर रणदीपला ‘खांदा’ देण्यास सांगितले होते. अभिनेत्याने दलबीरला त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे वचनही दिले. दलबीरच्या मृत्यूनंतर रणदीपने दिलेले वचन पूर्ण करत, रविवारी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थिती दर्शवली. यादरम्यान अभिनेत्याने दलबीरला फक्त खांदाच दिला नाही, तर त्यांना अग्नीही दिला. (randeep hooda paid tribute to sarabjit singh sister dalbir kaur)

उल्लेखनीय आहे की, दलबीर कौरने तिचा भाऊ सरबजीत सिंगसाठी दीर्घ लढा दिला होता. सरबजीतची पाकिस्तानातील तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले. आपल्या भावाची सुटका करण्यासाठी तिने भारत सरकारकडे, पाकिस्तान सरकारकडे विनंती केली. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर अखेर त्यांना विजय मिळाला. पण ज्या दिवशी सरबजीत सिंगची सुटका होणार होती, त्याच रात्री काही कैद्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

साल १९९०मध्ये पंजाबमधील भिखीविंड गावातील सरबजीत सिंग दारूच्या नशेत सीमेवरून पाकिस्तानात गेला होता. यादरम्यान तेथील पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला बॉम्बस्फोटाचा आरोपी घोषित केले. सबरजीत हा भारताचा गुप्तहेर असल्याचे पाकिस्तान पोलिसांनी वाटले. यानंतर या आरोपामुळे पाकिस्तानी न्यायालयाने सरबजीत सिंगला फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यांची बहीण दलबीर कौर यांनी आपल्या भावावर झालेल्या या अत्याचाराविरोधात कायदेशीर लढाई लढण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोहीम सुरू केली. सरबजीतच्या जीवनावर आधारित ‘सरबजीत’मध्ये रणदीप हुडा सरबजीत आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) दलबीर कौरच्या भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा