Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

कपिल शर्मा शोमध्ये रणधीर कपूर यांनी सांगितले त्यांच्या संघर्षाच्या काळाबद्दल, मुलींची फी भरायला देखील नव्हते पैसे

 

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकत असतात. अभिनयाची परंपरा जोपासणारे बॉलिवूडमध्ये अनेक कुटुंब आहेत. ज्यांनी अनेक पिढ्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे व्रत आचरले आहे. चित्रपटसृष्टीतील असेच एक सर्वात मोठे घराणे म्हणजे ‘कपूर घराणे.’ या कुटुंबातील जवळपास सर्वचजण अभिनय क्षेत्रात काम कर्यरत आहेत. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शशी कपूर, रणबीर कपूर, करिश्मा कपूर आणि करिना कपूर आदी अनेक कपूरनं खानदानातल्या कळकरांनी सिनेसृष्टी दणाणून सोडली. याच घरातील पहिली मुलगी असलेल्या करिश्मा कपूरने अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केले. अलिकडेच करिश्मा वडिल रणधीर कपूरसोबत ‘कपिल शर्मा शो’मध्ये आली होती.

या शोमध्ये रणधीर कपूर यांनी अनेक गोष्टी जगासमोर आणत काही खुलासे देखील केले. त्यांचे वडील असलेल्या राज कपूर यांच्याविषयी अनेक गुपितं त्यांनी सर्वांसमोर सांगितली. रणधीर कपूर म्हणाले की, “आजकाल कलाकारांसाठी पैसे मिळवणे खूप सोपे झाले आहे. परंतु, एकेकाळी कलाकरांना पैसे मिळवणे खूप कठिण होते. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती. माझ्याकडे माझ्या मुलांच्या शिक्षण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. तो काळ आयुष्यातील खूप कठिण काळ होता. मी माझ्या बायकोचा खर्चसुद्धा काढू शकत नव्हतो.”

‘राम तेरी गंगा मैली’, ‘आवारा’, ‘बाॅबी’ सारख्या हिट चित्रपटांनंतर राज कपूर यांनी अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. नर्गिस आणि राज कपूर यांच्या जोडीला चित्रपटसृष्टीत खूप पसंती मिळाली. याशिवाय त्यांनी डिंपल कपाडिया, जेबा बख्तियार आदी अभिनेत्रींना हिंदी चित्रपटांमध्ये आणले.

रणधीर कपूर यांनी राज कपूर यांच्याविषयीचे बरेच किस्से शेअर केले. या मंचावर कपिल शर्माने रणधीर यांना विचारले की, “राज साहेब रोमँटिक सीन तुमच्या समोर शूट करायचे की, ते म्हणायचे जा बाळा ५ रुपये घे आणि चाॅकलेट खाऊन ये? कपिलच्या या प्रश्नाचे उत्तर देताना रणधीर म्हणाले की, “आम्ही कलाकार आहोत आणि ते पण एक अभिनेते होते. मी ही अनेक अभिनेत्रींसोबत रोमँटिक सीन शूट केले आहे.”

रणधीर कपूर यांनी शोमध्ये त्यांच्या लव स्टोरीविषयी सांगितले. ते म्हणाले, “ ‘कल आज और कल’ या चित्रपटात मी गाणं गायले होते. त्याचवेळी माझी देखील लग्न करण्याची इच्छा होती.” १९७१ मध्ये, बबिता यांच्या कारकीर्दीचा एक महत्त्वाचा चित्रपट ‘कल आज ओर कल’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणधीर कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि ही मैत्री कधी प्रेमात रूपांतर झाली हे दोघांनाही कळलं नाही. नंतर त्यांनी लग्न केलं मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या आल्या. दोघे वेगळे देखील झाले होते, मात्र पुन्हा ते एकत्र आले.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा