Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

Video: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा आणि कार्तिकची मुलींसोबतची ऑफस्क्रीन मस्ती कॅमेऱ्यात कैद

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्या वळणावर आलेली आहे. मालिकेने ६ वर्षांचा लीफ घेतला आहे. अनेकांना मालिकेतील हे वळण खूप आवडले आहे. याआधी दीपा आणि कार्तिकला जुळ्या मुली झालेल्या दाखवल्या होत्या, पण त्या मुली त्याच्याच आहेत. हे मान्य करण्यास कार्तिक तयार नसतो. तसेच दीपाची बहीण श्वेता ही देखील तिचे बाळ या जगात येऊ नये म्हणून प्रयत्न करत असते. दीपाची डिलिव्हरी झाल्यानंतर तिची सासू एक मुलगी घेऊन तिच्या घरी जाते आणि सांगते की, तिने हे बाळ दत्तक घेतले आहे.

त्यामुळे दीपाची एक मुलगी तिच्याकडे, तर दुसरी मुलगी कार्तिककडे वाढत असते. अशातच ही मालिका एक वेगळ्या वळणावर आली. ६ वर्षाचा लीफ घेतल्यानंतर आता दीपाच्या दोन्ही मुली मोठ्या झालेल्या दाखवल्या आहेत. त्या दोघींची नावे दीपिका आणि कार्तिकी अशी असतात. अशातच या मालिकेतील दीपा, कार्तिक आणि त्यांच्या दोन मुलींचा ऑफस्क्रीन मस्ती करताना एक व्हिडिओ समोर आला आहे. (rang majha vegla serial actors off screen cemistry viral on social media)

सोशल मीडियावर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दीपा, कार्तिक आणि त्यांच्या दोन मुली मस्ती करत आहेत. व्हिडिओमध्ये दीपिका आणि कार्तिकी दीपाकडे पळत येत असतात. दीपा देखील त्यांची वाट बघत असते. पण तितक्यात कार्तिक तिथे येतो आणि दीपाला उचलून नेतो. त्यावेळी त्या चौघांची मस्ती पाहायला मिळत आहे.

मालिकेत रेशमा शिंदे आणि आशुतोष गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त हर्षदा खानविलकर, अनघा भागरे, अंबर गणपुळे हे कलाकार आहेत. तसेच आता मालिकेत कार्तिकीच्या भूमिकेत बालकलाकार साईशा भोईर आणि दीपिकाच्या भूमिकेत स्पृहा दळी दिसत आहे. मालिकेत त्या दोघींची एन्ट्री झाल्यामुळे मालिका एका रंजक वळणावर आली आहे. प्रेक्षकांना देखील या दोन चिमुरड्या कलाकारांना पाहून खूप आनंद होत आहे. आता दीपिका आणि कार्तिकीमुळे या मालिकेत काय सकारात्मक बदल होणार आहेत, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

हे देखील वाचा