Monday, July 15, 2024

लेडी सिंघम झाली राणी चॅटर्जी, शक्ती कपूरला दिले ‘हे’ चॅलेंज

राणी चॅटर्जी (Rani Chatterjee) ही भोजपुरी चित्रपट जगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणार्‍या सौंदर्याने राणीने भोजपुरी चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा राणी सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या राणीच्या लेडी सिंघम चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील राणी एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राणी चॅटर्जी थेट बॉलिवूड सुपरस्टार शक्ति कपूरला (shakti Kapoor) आव्हान देत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, भोजपुरी क्वीन राणी चॅटर्जीचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. सध्या राणी चॅटर्जीच्या लेडी सिंघम या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत्री राणीनेही तिच्या भोजपुरी चित्रपट लेडी सिंघमचा ट्रेलर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राणी चॅटर्जी आणि अभिनेते शक्ती कपूर समोरासमोर दिसत आहेत. व्हिडिओमध्ये राणी आणि शक्ती कपूर अनेक गोष्टींमध्ये एकमेकांना अपमानित करण्याचाही प्रयत्न करत आहेत.

राणी आणि शक्ती कपूरचा हा व्हिडिओ तिच्या लेडी सिंघम या भोजपुरी चित्रपटातील आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच धमाकेदार आहे, ज्यामध्ये राणी चॅटर्जी पोलिसांची वर्दी परिधान करताना दिसत आहे, त्याचप्रमाणे शक्ती कपूर त्यांच्या देसी लूकमध्ये एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत. चित्रपटात शक्ती कपूर नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत, त्याची एक झलक ट्रेलरमध्ये दाखवली आहे. दरम्यान राणी चॅटर्जीने आपल्या करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपट ‘ससुरा बडा पैसा वाला’ मधून केली होती, या चित्रपटात राणी भोजपुरी स्टार मनोज तिवारीसोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 अधुरी प्रेम कहाणी! या व्यक्तीमुळे आला ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा

जेव्हा काजोलने मुलांसह घर सोडण्याचा घेतला होता निर्णय, अशाप्रकारे अजय देवगणने केली होती मनभरणी

अजय देवगण आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक, खासगी जेटपासून मोठ्या घरांपर्यंत अनेक गोष्टींचा आहे समावेश

हे देखील वाचा