Monday, July 1, 2024

भोजपुरी क्वीन राणी चॅटर्जीच्या डान्सवर चाहते झाले फिदा, ‘ऑटोमॅटिक लेफ्ट-राइट’वर लावले जोरदार ठुमके

भोजपुरी चित्रपट क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक दशके या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. या यादीमध्ये भोजपुरी क्वीन राणी चॅटर्जीचे (Rani Chatarjee) नाव प्रामुख्याने घेतले जाते. राणी चॅटर्जी ही भोजपुरी चित्रपटक्षेत्रातील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेक वर्ष या क्षेत्रात आपल्या अभिनयाची जादू दाखवताना दिसली आहे . राणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या तिच्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल होताना दिसत आहे.

राणी चॅटर्जी ही भोजपुरी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. यावरून ती आपल्या चाहत्यांशी नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिचा एक डान्सचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये राणी आपल्या मैत्रिणीसोबत एका पुलावर उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी दोघीही नवीन भोजपुरी गाणे कमरिया ‘ऑटोमॅटिक लेफ्ट-राइट’वर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिने घातलेल्या निळ्या ट्राउजर आणि लाल रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमधील तिच्या भन्नाट डान्स मुव्हज ने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. त्यामुळेच या डान्सवर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या या डान्सवर तिच्या चाहत्यांनी सुंदर प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले आहे. (rani chatterjee latest bhojpuri dance video sets internet on fire watch here)

दरम्यान भोजपुरी क्वीन राणी चॅटर्जीने आपल्या अभिनय कारकिर्दिला ‘ससुरा बडा पैसा वाला’ या चित्रपटातून सुरूवात केली होती.या चित्रपटात तिने दिग्गज अभिनेते मनोज तिवारी यांच्यासोबत काम केले होते. या पहिल्याच चित्रपटाने तिला जोरदार लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर हळूहळू तिने या क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रसिद्धी मिळवायला सुरूवात केली. तिच्या दमदार चित्रपटांची आजही चर्चा पाहायला मिळते. रानीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्याशी ती आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचा –

हे देखील वाचा