लता दीदींचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गाऊन राणू मंडल एका रात्रीत स्टार झाली. तिने गायलेलं हे गाणं त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं. अनेकांनी तिच्याविषयी सहानुभूती दाखवली. हिमेश रेशमियाने तिला त्याच्या चित्रपटासाठी एक गाणं गाण्याची संधी देखील दिली. ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं त्यावेळी खूप गाजलं. प्रेक्षकांनी राणू मंडलला डोक्यावर घेतलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती ‘मनीके मागे हिते’ हे गाणं गात आहे. यावेळी ती नेहमीसारखी साडीमध्ये नाही, तर लाल रंगांच्या टी-शर्टमध्ये झळकली. तिचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. (Ranu mandal again sings viral song manike mange hithe watch video)
या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. यातील एकाने कमेंट करत लिहिले आहे आहे की, “सारखं सारखं व्हायरल होऊन प्रसिद्धी नाही मिळत.” तर दुसऱ्या एकाने खतरनाक कमेंट करत लिहिले आहे की, “तू आणि तुझी गाणी एक आपत्ती आहेत.” आणखी एकाने “आता हिला ऐकण्यात आणि पाहण्यात कुणालाच रस नाही”, असे लिहिले आहे.
राणू मंडलचे आधीचे काही दिवस फार छान गेले. तिला खूप प्रसिद्धी मिळाली. परंतु ते म्हणतात ना, ‘चार दिन की चांदनी’ तसाच काहीसा प्रकार तिच्याबरोबर घडला. ती आता कुठे आहे काय करते हे कुणालाच माहीत नाही. कारण एकदा तिच्या एका चाहत्याने तिच्या बरोबर सेल्फी काढण्याचा आग्रह केला होता. तेव्हा तिने त्याच्यावर चिडून चुकीच्या पद्धतीने उत्तर दिले होते. त्यावेळी तिला खूप ट्रोल करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा रस्त्यावर गाणी गात पोट भरताना दिसली होती. त्यावेळी ती तिच्या जुन्या कपड्यांमध्ये होती. आता तिचे ‘मनीके मागे हिते’ हे गाणं व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांना तिला पुन्हा चित्रपटात गाण्याची संधी मिळणार? असे प्रश्न पडत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद