अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा: द राइज (Pushpa The Rise) सिनेमाने प्रेक्षकांना तुफान वेड लावले आहे. या सिनेमातील संवाद, गाणी आणि डान्स स्टेप्सने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. कलाकारांपासून सामान्य लोकं सर्वच या सिनेमातील गाण्यावर थिरकताना, व्हिडिओ बनवताना दिसत आहे. या सिनेमाने बॉलिवूडमधील कलाकारांना देखील चांगलीच भुरळ घातली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने अमाप कमाई केली असून सिनेमाच्या फक्त हिंदी वर्जननेच १०० कोटींपेक्षा अधिक कमावले आहे. अजूनही या सिनेमाची जादू कायम आहे.
रानू मंडलला देखील ‘पुष्पा: द राइज’ सिनेमाने भुरळ घातली आहे. यातच रानू मंडलचा (Ranu Mondal) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजताना आणि व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रानू सिनेमातील अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यातील हुक स्टेप करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रानूने टि शर्टसोबत साडी नेसलेली दिसत असून, गाण्याच्या बॅकग्राऊंडला ‘पुष्पा’ सिनेमातील ‘श्रीवल्ली’ गाणे वाजत असून, या गाण्याची हुक स्टेप करताना ती दिसत आहे. आतापर्यंत जेवढ्या लोकांनी या गाण्यावर किंबहुना या गाण्यातील हुक स्टेपवर डान्स केला त्या सर्वानी उघडी असलेली चप्पल घातली होती. मात्र रेणूच्या चप्पलचे बेल्ट उघडे राहिल्याने ती डान्स करताना अडखळली देखील. हातात काठी घेऊन डान्स करणाऱ्या रानूचा हा अंदाज काही लोकांना आवडलेला दिसत नाही. तशा कमेंट्स करत लोकांनी तिच्या डान्सची खिल्ली देखील उडवली आहे.
या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्समध्ये एकाने लिहिले, ‘प्रसिद्ध होण्यासाठी रानू मंडल काहीही करणार का?’ अजून एकाने लिहिले, ‘हे नक्की काय सुरु आहे?’, दुसऱ्याने लिहिले, ‘हि डान्स करत आहे की, मजा करत आहे समजतच नाही. तर एकाने म्हटले, “ये दीदी तुझ्याकडून नाही होणार.’ रानूच्या या व्हिडिओवर अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी रानू असे व्हिडिओ करताना दिसते.
हेही वाचा :