Wednesday, February 5, 2025
Home भोजपूरी रानू मंडल यांनी गायले छट पूजेचे गाणे? व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध कमेंट्स

रानू मंडल यांनी गायले छट पूजेचे गाणे? व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध कमेंट्स

सोशल मीडिया कोणासाठी वरदान तर कोणासाठी श्राप ठरत आहे. अनेकांच्या आयुष्याला चांगली आणि मोठी कलाटणी देणारे हे माध्यम कोणाचे चांगले आणि मोठे करिअर खराब देखील करू शकते. याच सोशल मीडियावर काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, ज्यात एक महिला रेल्वे स्टेशन बाहेर गाणे गात होती. या व्हिडिओमधून ती महिला रातोरात प्रसिद्ध झाली तिची नाव होते रेणू मंडल. या रेणू मंडलला बॉलिवूडमधील काही लोकांनी गाण्याची संधी देखील दिली. मात्र ज्या वेगाने त्या या क्षेत्रात आल्या त्याच वेगाने रानू या इंटस्ट्रीमधून गायब झाल्या. आता या रेणू मंडल यांचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारतात खासकरून बिहार, झारखंडच्या भागात छट पूजेचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बिहार, झारखंड या दोन राज्यांमधील सर्वात मोठा सण म्हणून हा सण साजरा केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर नवनवीन गाणी देखील प्रदर्शित केली जात आहेत. त्यातच सोशल मीडियावर एका गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ते गाणे आहे, रानू मंडलच्या छठ पूजेनिमित्त गायलेले गाणे. यात रानू मंडल हातात सूप घेऊन सूर्याची प्रार्थना करताना दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा रानू यांनी अशाप्रकारे छठ पूजेचे गाणे गायले असून यावर विविध कमेंट्स पाहायला मिळत आहे.

त्यांनी गायलेल्या या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. तिच्या या गाण्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून, असंख्य लाईक्स देखील मिळाले आहे. दरवर्षी छठ पूजेदरम्यान भोजपुरी गायक पवन सिंग, खेसारी लाल यादव, शारदा सिन्हा, अक्षरा सिंग यांची गाणी प्रसिद्ध होत असतात. मात्र यावर्षी पहिल्यांदा रानूने छठ पूजेचे गाणं गायलं आहे. पण यात कुठेही रानू मंडल गाताना दिसत नाही. त्यामुळे हे गाणं नक्की त्यांनी गायले आहे की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

अनेकांनी कमेंट करत लिहिले की, “फक्त लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी रेणू मंडल यांचे नाव घेणे योग्य नाही.”, रानू मंडल यांना देखील यावेळी ट्रोल केले गेले. अनेक जणांनी रानू मंडल यांना आता पुन्हा त्यांचे करिअर होणे अशक्य असल्याचे सांगितले आहे. एकाने लिहिले, “सर्व मूड खराब केला.” या व्हिडिओला Mridang Music World नावाच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

-अरेरे! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला ‘सूर्यवंशी’; निर्मात्यांमध्ये काळजीचे वातावरण

-‘सूर्यवंशी’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीझ, ११ वर्षांनी पाहायला मिळाला कॅटरिना आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा