Wednesday, April 16, 2025
Home बॉलीवूड रानू मंडल आठवतेय का? तिचा ‘बचपन का प्यार’ गाणे गातानाचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

रानू मंडल आठवतेय का? तिचा ‘बचपन का प्यार’ गाणे गातानाचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

तुम्हाला रानू मंडल आठवते का? सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गाण रेल्वे स्टेशनवर २०१९साली गाताना दिसली होती. रानूचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला गायक हिमेश रेशमियाने त्याच्या चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली होती. मात्र, त्यानंतर रानू इंडस्ट्रीमधून गायब झाली होती. दरम्यान रानूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या एका व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती छत्तीसगडमधील रहिवासी सहदेव दिरडोने गायलेलं ‘बचपन का प्यार’ हे गाणे गाताना दिसत आहे. रानू मंडलच्या या व्हिडिओवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

‘बचपन का प्यार’ या गाण्यातून प्रसिद्ध झालेला सहदेव दिरडो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अलीकडेच त्याच्या या गाण्याला प्रसिद्ध रॅपर बादशाहने एक नवीन रूपात प्रदर्शित केले आहे. या व्हिडिओचे अनेक चाहते प्रचंड कौतुक करत आहेत. रानू मंडल आता ‘बचपन का प्यार’ गाणे गाताना दिसत आहे. बराच काळ सोशल मीडियापासून दूर असलेल्या रानूचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, रानूच्या हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती माईक हातात धरुन उभा आहे. आणि रानू मॅक्सी घालून हात पाठीमाघे टांगून उभी आहे. ती स्वतः च्या शैलीत असे अप्रतिम ‘बचपन का प्यार’ हे गाणे गात आहे. ती व्यक्ती देखील रानूला प्रोत्साहन देण्यासाठी गाणे गुनगुनत आहे. हा व्हिडिओ काही सेकंदाचा आहे, पण तो प्रंचड लोकप्रिय होत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर सोशल मीडियावर कमेंट करत आहे. एका युजरने म्हटले आहे की, “ती चांगली गात आहे.” दुसऱ्याने लिहिले, “ती जिवंत आहे का?” त्याचबरोबर अनेक जण इमोजी पाठवून प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर बादशाहा मधील ‘बचपन का प्यार’ हे गाणं रिलीज झाल्यापासून यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’, गाण्यावर डान्स करत रिंकूने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; तुम्हीही पाहा

-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह परदेशातही! अमेरिकन व्यक्तीने ‘चक दे इंडिया’ गाण्यावर केला भन्नाट डान्स

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

हे देखील वाचा