सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे रातोरात एखादी व्यक्ती लोकप्रिय होऊ शकतो. चित्रपटातून जेवढी लोकप्रियता मिळत नाही त्यापेक्षाही जास्त लोकप्रियता आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळते. याचेच एक उदाहरण म्हणजे रानू मंडल. तिच्यातील गायनाचे कौशल्य पाहून संगीतकार हिमेश रेशमीयाने तिला त्याच्यासोबत गाण्याची संधी दिली होती. त्या नंतर तिचा हा आवाज सर्वत्र पसरला होता आणि ती लोकप्रिय झाली होती. परंतु ती तिची ही लोकप्रियता सांभाळू शकली नाही. ग्लॅमरच्या या दुनियेत आल्यावर तिला अभिमान चढला. म्हणतात की, ‘गर्वाचे घर खाली’ त्याप्रमाणे ती पुन्हा तिथेच आली जिथे ती सुरुवातीला होती. परंतु आता देखील ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर आजही तिचा कोणता ना कोणता व्हिडिओ किंवा फोटो येतच असतो.
आता पुन्हा एका सोशल मीडियावर रानू मंडल चर्चेत आली आहे. असे ऐकू येत आहे की, रानू मंडल पहिल्यांदा कोणते तरी छठचे गाणे गात आहे. यावेळी बिहार आणि बंगालमधील काही भागात छठची धमाल चालू आहे. इथे छठची गाणी मोठ्या प्रमाणात गायली जात आहे. या गीतांना रानू मंडल हिचा आवाज आहे असे सांगून व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. यावेळी प्रेक्षक खूप भडकले आहेत की, तिच्या नावाचा वापर करून असे व्हिडिओ का बनवले जात आहे? (Ranu mandal videos once again viral on social media, she sings chhath geet)
सर्वत्र रानू मंडल हिच्या नावाचा प्रचार केला जात आहे. तसेच हे गाणे यूट्यूबवर देखील व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत ९ लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत. सोशल मीडियावर अनेकजण म्हणत आहेत की, हा रानू मंडलचा आवाज नाहीये. एकजण सोशल मीडियावर म्हणत आहे की, “फक्त तुमचे लाईक आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी इतर कोणाच्यातरी नावाचा आणि फोटोचा वापर करणे चुकीचे आहे.”
रानूचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चिकन करी बनवताना दिसत आहे. यासोबत ती ‘जब कोई बात बिगड जाये’ हे गाणे गाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-