आजकाल सोशल मीडियावर ‘पावरी हो रही है’चा जोरदार ट्रेंड चालू आहे. या ट्रेंडला अक्षरशः सर्वांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी युवतीने बनवलेल्या ‘पावरी हो रही है’या व्हिडिओला, यशराज मुखाते याने म्युझिकल ट्विस्ट देऊन व्हायरल केला होता. आता लोक या व्हिडिओला आपापल्या पद्धतीने पुन्हा तयार करीत आहेत. बॉलिवूडमध्येही ‘पावरी हो रही है’ ची जादू आपण पाहू शकतो. आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी हा ट्रेंड फॉलो केला आहे.
आता अभिनेता रणवीर सिंगही या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याने त्याच्या चाहत्यांसोबत गाजर हलवा पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. रणवीर सिंगने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने एक बॉक्स आणि चमचा पकडलेला दिसत आहे. यानंतर तो म्हणतो, “ये हम हैं, ये हमारा गाजर का हलवा है, और हमारी पावरी हो री है.” रणवीर हे बोलू लागताच एक दुसरी मुलगी त्याच्यात सामील झाली. परंतु, त्या मुलीने मास्क लावलेला दिसत आहे.
या अगोदर दीपिका पादुकोणनेही हा ट्रेंड फॉलो करत एक फोटो शेअर केला होता. हा तिच्या बालपणीचा फोटो होता. तसेच, तिने तीन फोटो शेअर करत लिहिले की, “ये हम हैं, ये हमारा घोड़ा है, और ये हमारी पावरी हो रही है.”
त्याचवेळी शाहिद कपूर आणि रणदीप हुड्डाही “पावरी हो रही है” चा ट्रेंड फॉलो करताना दिसले. रणदीपने आपल्या आगामी चित्रपट ‘इन्स्पेक्टर अविनाश’च्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, तर शाहिद कपूरनेही सेटवरूनच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शाहिद कपूरची ओळख करत सांगतो, “ये मेरा स्टार है, ये हम हैं, और यहा पावरी हो रही है.”