Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड अर्जुन कपूर अन् रणवीर सिंगच्या ऑफस्क्रीन ‘दोस्ताना’ने वेधले सर्वांचे लक्ष; ‘अशी’ मारली एकमेकांना मिठी

अर्जुन कपूर अन् रणवीर सिंगच्या ऑफस्क्रीन ‘दोस्ताना’ने वेधले सर्वांचे लक्ष; ‘अशी’ मारली एकमेकांना मिठी

आजच्या पिढीच्या अनेक अभिनेत्यांमध्ये खूप चांगली मैत्री असल्याचे आपल्याला बऱ्याच कार्यक्रमांच्या वेळेस लक्षात येते. कलाकार आणि त्यांची इतर कलाकारांसोबतची मैत्री नेहमी मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजताना दिसते. कलाकारांची मैत्री आणि त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सोशल मीडियावर ‘आये दिन’ व्हायरल होत असतात. बॉलिवूडमधील असेच जीवलग मित्र म्हणजे अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग. अर्जुन आणि रणवीर यांची मैत्री इंडस्ट्रीमध्ये आणि बाहेर देखील खूप प्रसिद्ध आहे. या दोघांनी सोबत करण जोहरच्या शोमध्ये देखील हजेरी लावली आहे. 

सध्या हे दोघे खूपच चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या दोघांचा दिसणारा ऑफस्क्रीन ‘दोस्ताना’ मीडियामध्ये आणि इंटरनेटवर खूपच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघं एकमेकांना अशा पद्धतीने मिठी मारत आहे, जे पाहून पाहणाऱ्याला नक्कीच वेगळेच काहीतरी वाटेल. (ranveer singh and arjun kapoor bromance video)

अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग या दोघांनी २०१४ साली ‘गुंडे’ सिनेमात एकत्र काम केले. त्यानंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट आणि दृढ झाली. या दोघांना नुकतेच एका फुटबॉल मॅच दरम्यान पाहिले गेले. याच ग्राउंडवरचा हा व्हिडिओ असून, यात रणवीर बेंचवर झोपला असून, अर्जुन येतो आणि त्याला तो झोपलेला असतानाच मिठी मारतो. त्यांची मिठी खूपच चांगली होती. मिठी मारून झाल्यावर रणवीर अर्जुनला गालावर किस देखील करतो. मात्र, दुरून बघताना बघणाऱ्यांना काही तरी चुकीचे वाटेल अशीच त्यांची मिठी दिसते. त्यामुळे हा व्हिडिओ जरा जास्तच चर्चेत आला आहे.

या व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल भयानी या अकाऊंटवरून शेअर केला गेला असून, त्यांच्या या व्हिडिओवर प्रेक्षक आणि फॅन्स यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या मैत्रीचे भरभरून कौतुक केले आहे, तर काहींनी त्यांना त्यांच्या मिठीवरून ट्रोल केले आहे. अर्जुन लवकरच ‘भूत पोलीस’ या मल्टीस्टारर सिनेमात दिसणार असून, रणवीरचा ’83’ हा सिनेमा चित्रपटगृह बंद असल्यामुळे प्रदर्शित होत नाहीये.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल

-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित

-‘शरारा शरारा’ गाण्यावर डान्स करत शमिता शेट्टीची ‘बिग बॉस ओटीटी’वर एन्ट्री

हे देखील वाचा