Saturday, June 29, 2024

भारीच ना! आलिशान बंगल्यानंतर आता क्रिकेट टीमचे मालक बनले ‘दीपवीर’

क्रिकेट आणि सिनेमा यांचं नातं खूप जुनं आहे. शाहरुख खानपासून ते प्रिती झिंटापर्यंत अनेक कलाकार आहेत, ज्यांना क्रिकेट आवडतं आणि त्यांनी आपापल्या संघांसाठी मोठी बोली लावली आहे. शाहरुख आणि प्रिती दोघेही इंडियन प्रीमियर लीगमधील आपापल्या संघांचे मालक आहेत. आता या यादीत आणखी एका सुंदर बॉलिवूड जोडप्याचे नाव समाविष्ट होणार आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचाही या यादीत समावेश झाला आहे. हे दोघे आता आलिशान बंगल्यासोबतच, आयपीएल टीमचेही मालक बनले आहेत.

पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मध्ये अनेक बदल दिसणार आहेत. आतापर्यंत ८ संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसत होते, पण आता ८ नव्हे, तर १० संघांचा समावेश केला जाईल. समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही संघ खरेदीसाठी स्वारस्य दाखवले आहे. (ranveer singh and deepika padukone set to bid for new ipl team know details)

अहवालानुसार, बॉलिवूड सुपरस्टार जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग क्रिस्टियानो रोनाल्डोच्या मँचेस्टर युनायटेडसह नवीन आयपीएल संघावर पैज लावू शकतात. आतापर्यंत दोन लोक एकत्र टीम विकत घेत असत, परंतु आता अनेक कंपन्या किंवा कन्सोर्टियम नवीन टीमसाठी बोली लावू शकतात. दोन्ही संघांची बोली बीसीसीआय घेईल.

आता जर रणवीर आणि दीपिकाने एखादी टीम विकत घेतली, तर ते शाहरुख खान, प्रीती झिंटी, जुही चावला, शिल्पा शेट्टी यांच्यासह या यादीत सामील होतील. दुसरीकडे, आयपीएलचे १४वे सत्र नुकतेच संपले आहे आणि एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे

-अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ २’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा 

-सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक पद्धतीने जोडी अडकली लग्नबंधनात

हे देखील वाचा