×

रणवीर सिंगने अनुष्का शर्मावर केली ‘इतकी’ अश्लील कमेंट, ऐकून अभिनेत्रीला अनावर झाला राग

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तो त्याच्या प्रत्येक पात्रात जीव ओततो. याशिवाय तो संपूर्ण इंडस्ट्रीत फंकी फॅशन स्टाइल, जबरदस्त एनर्जीसाठीही प्रसिद्ध आहे. तो गंमतीत काहीही बोलतो. पण एकदा तो अनुष्का शर्माला (Anushka Sharma) असे काही बोलला होता, जे ऐकून ती थक्क झाली होती.

व्हायरल होतोय व्हिडिओ
हे प्रकरण २०११ सालचे आहे, जेव्हा रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा करण जोहरच्या (Karan Johar) चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये पोहोचले होते. याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. (ranveer singh comments on anushka sharma private parts coffee with karan show video viral)

लाईव्ह शोमध्ये बोलला होता ‘असे’ काही
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करण, रणवीर आणि अनुष्का यांच्यात खूप मजा मस्ती सुरू आहे. पण त्यानंतर रणवीर अनुष्कावर एक अश्लील टिप्पणी करतो, जे ऐकून अनुष्काही अस्वस्थ होते. खरं तर, रणवीर अनुष्काच्या प्रायव्हेट पार्टबद्दल असभ्य गोष्टी बोलतो, जे ऐकल्यानंतर अनुष्का काही काळासाठी शॉकमध्ये राहते. तर त्यावेळी करण हसायला लागतो. त्यानंतर, अनुष्का शोमध्येच रणवीरला मारहाण करू लागते आणि म्हणते, “माझ्याशी असे बोलू नकोस.”

‘या’ चित्रपटांमध्ये केलंय एकत्र काम
रणवीर सिंगने ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ज्यामध्ये त्याच्यासोबत अनुष्का शर्मा दिसली होती. मात्र, अनुष्काने शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ‘बँड बाजा बारात’नंतर या दोघांनी ‘दिल धडकने दो’ आणि ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

चार वर्षांनी पुनरागमग करतेय अनुष्का शर्मा
विशेष म्हणजे, अनुष्का शर्मा लग्नानंतर गेल्या चार वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर होती. मात्र आता ती ‘चकदा एक्सप्रेस’मधून पुनरागमन करत आहे. अनुष्काचा शेवटचा चित्रपट ‘झिरो’ २०१८ साली रिलीझ झाला होता. ज्यामध्ये तिने शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत स्क्रीन शेअर केली होती.

Latest Post