Tuesday, July 9, 2024

‘ढोलदा’ गाण्यावर रणवीर सिंगसोबत आलिया भट्टने लावले जोरदार ठुमके, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री सध्या तिच्या ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच अभिनेत्रीला प्रमोशनल इव्हेंट दरम्यान ‘गली बॉय’ या चित्रपटातील तिचा को-स्टार रणवीर सिंगसोबत डान्स करण्याची संधी मिळाली आहे. त्याने आलिया भट्टसोबत ‘ढोलिदा’ गाण्यावर डान्स केला.

आलिया भट्ट जेव्हा स्टुडिओमध्ये ‘गंगुबाई काठीयावाडी’ चित्रपटाचे प्रमोशन करत होती, तेव्हा ती पांढरी आणि गुलाबी रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. रणवीर टी-शर्ट आणि डेनिममध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला रणवीर ‘ढोलिदा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर आलिया देखील त्याच्यासोबत डान्स करू लागते. (Ranveer Singh dance with Alia Bhatt on the song dholida)

या व्हिडिओच्या शेवटी आलिया त्याला फ्लाईंग किस देऊन बाय म्हणते. रणवीर आणि आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करून रणवीरचे कौतुक करत आहेत. तसेच आलियाचे देखील कौतुक करत आहेत.

ढोलीदा हे एक सेलिब्रेशनचे गाणे आहे. ज्यात आलिया पांढऱ्या साडीमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत गरबा करताना दिसत आहे. हे गाणे चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी खुद्द कंपोज केले आहे.

‘गंगुबाई काठीयावाडी’ हा आलिया भट्टचा संजय लीला भन्साळीसोबत पहिला चित्रपट आहे. तर रणवीर सिंगने त्यांच्यासोबत या आधी ‘गोलियो की रासलीला : रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात काम केले आहे. ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात अजय देवगण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा