बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर अकाऊंटवरुन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करतो. अलीकडेच, रणवीरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. खरं तर, रणवीरने त्याचे ऍब्स दाखवतानाचे काही फोटो शेअर केले. त्याच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. रणवीरने शेअर केलेल्या फोटोतील काही फोटो बाथरूममध्ये शाॅवरखाली अंघोळ करतानचे आहे.
त्याच्या या बोल्ड फोटोशूटवर चाहतेच नाही, तर अनेक कलाकारही कमेंट्स करत आहेत. फोटोवर प्रतिक्रिया देताना मनिषा मल्होत्राने लिहिले की, “उफ्फ.. व्वा.” यासोबतच क्रुबा सैतने लिहिले की, “तु नाही रडत, रडत तर मी आहे.”
नुकतेच रणवीरने त्याच्या चाहत्यांसोबत एक सोशल मीडियावर लाईव्ह सेशन घेतले होते. त्यावेळी त्याने अनेक मजेशीर उत्तरे देऊन चाहत्यांची मने जिंकली आहे. या लाईव्ह सेशनमध्ये रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणने कमेंट केली होती. ती कमेंट खूप चर्चेत आली होती. कमेंटमध्ये दीपिकाने लिहीले की,“ तू घरी कधी येणार आहेस?” यावर अनेक चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या होत्या. दीपिकाच्या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीरने लिहिले की,“जेवण गरम कर बेबी, मी लगेच येतो घरी.”
शिवाय लवकरच रणवीर ओटीपी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, रणवीरने नेटफ्लिक्ससोबत एका रियॅलिटी शोसाठी करार केला आहे. रणवीरचे नाव बाॅलिवूडच्या ए-लिस्टर स्टार्सच्या यादीत सामील झालेले आहे. असे म्हटले जात आहे की, रणवीर ‘सिम्बा’ चित्रपकाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पावलावर पाऊल ठेवू शकतो. रणवीर ‘खतरों के खिलाडी’चा होस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रणवीरविषयी बोलायचे झाले, तर तो लवकर ‘जयेश भाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तसेच करण जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये रणवीर आलियासोबत रोमांस करताना दिसेल. शिवाय तो ‘अख्तर के गैंगस्टर’ ड्रामामध्ये कॅटरिनासोबत स्क्रिन शेअर करताना दिसू शकतो.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर
-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू