बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग चित्रपट क्षेत्रातील यशानंतर, आता टेलिव्हिजन शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसून येणार आहे. तो सध्या ‘द बिग पिक्चर’ नावाचा शो करत आहे. या शोमध्ये सहभागी स्पर्धकाने त्याची कहाणी सांगितली. यावेळी त्याच्या प्रतिकूल परिस्थितीची कहाणी ऐकून रणवीर सिंग खूपच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. चित्रपटात नेहमी डॅशिंग भूमिकेत दिसणारा रणवीर पहिल्यांदाच भावूक झाल्याने, त्याच्या या नवीन रुपाचे दर्शन प्रेक्षकांना झाले.
रणवीर सिंग सध्या टीव्ही वर ‘द बिग पिक्चर’ नावाचा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ज्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये बालपणीच पितृछत्र हरवलेल्या एका स्पर्धकाची कौटुंबिक परिस्थिती आणि पार्श्वभूमी जाणून घेताना, रणवीर सिंग खूपच भावूक झाला होता. नेहमी चित्रपटात धडाकेबाज भूमिकेत दिसणार्या रणवीरच्या या हळव्या रुपाचं पहिल्यांदाच दर्शन झाल्याने चाहतेही चकित झाले होते. (ranveer singh got emotional after hearing the story of the contestants struggle in the big picture)
या व्हायरल व्हिडिओमध्ये, कार्यक्रमादरम्यान रणवीर सिंग अभय सिंग नावाच्या एका स्पर्धकाला आमंत्रित करतो. मंचावर आल्यानंतर, अभय सिंग आपला परिचय देण्यास सुरुवात करतो. यावेळी बोलताना अभय सिंग सांगतो की “इयत्ता सातवीमध्ये असतानाच माझे वडील सोडून गेले. त्यावेळी मी इतका लहान होतो की, काय झालंय हे सुद्धा मला समजत नव्हतं. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने आमचा सांभाळ केला. घरची परिस्थिती इतकी नाजूक होती की पैशाअभावी आम्हा भावंडांना शिक्षण सुद्धा घेता आले नाही.”
अभय सिंग ज्या बिकट परिस्थितीतून आला आहे, ते ऐकून रणवीर सिंग खूपच भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसत होते. यानंतर रणवीर सिंगने अभयच्या आईला व्हिडिओ कॉल करुन त्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या या संघर्षाला सलाम सुद्धा केला. यावेळी आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये रणवीर सिंग अभय सिंगच्या आईसोबत सेटवर मस्ती करताना दिसून येत आहे. अभयच्या आईने रणवीरच्या मिशांच कौतुक केल्याचही दिसत आहे.
दरम्यान शोमध्ये पत्नी दीपिकाला आठवत रणवीर म्हणतो की “तुम्हाला माहीतच आहे की, माझ लग्न झालंय आणि २-३ वर्षात आम्हाला मूलही होतील. तुमची वहिनी बालपणी किती क्यूट दिसत होती. मी तिचा बालपणीचा फोटो रोज बघतो आणि तिला सांगतो की, मला पण अशी एखादी दे म्हणजे माझी सुद्धा लाइफ सेट होऊन जाईल.” रणवीरचे हे बोलणे ऐकून उपस्थित प्रेक्षक जोरजोरात हसू लागतात.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रणवीर सिंगने फॅमिली प्लॅनिंगबद्दल केला खुलासा; म्हणाला, ‘आम्हालाही दोन…’