Wednesday, April 30, 2025
Home बॉलीवूड रणवीर सिंगला सासूशी घेता येत नव्हते जुळवून, मग पुढे ‘अशी’ लढवली शक्कल

रणवीर सिंगला सासूशी घेता येत नव्हते जुळवून, मग पुढे ‘अशी’ लढवली शक्कल

करण जोहरचा (karan johar)सर्वात लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण’चा नवा सीझन (7 जुलै) पासून सुरू होत आहे. आत्तापर्यंत टीव्हीवर प्रसारित होणारा हा शो प्रथमच ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा शो केवळ डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. शोचा हा नवीन सीझन सुपर एनर्जेटिक रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या मजेदार एपिसोडने सुरू होणार आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट (alia bhatt)हे दोघेही आपापल्या जोडीदारासोबत आनंदात आहेत, पण या सोफ्यावर आलेल्या रणवीर सिंगने लग्नानंतरच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. पण रणवीर सिंग (ranvir singh) म्हणतो की, दीपिका पदुकोणशी (deepika padukone) लग्न केल्यापासून त्याचे आयुष्य आणि कपड्यांमध्ये खूप बदल झाला आहे.

रणवीर सिंग म्हणाला, “मी अजूनही सांभाळत आहे, अजूनही नवीन गोष्टी घडताना दिसत आहेत. सुरुवातीला, माझ्याकडे आता दोन वॉर्डरोब आहेत. जेव्हा मी बंगलोरला जातो तेव्हा माझ्याकडे एक खास वॉर्डरोब असतो – पांढरा टी-शर्ट आणि निळी जीन्स”

शोमध्ये करणने रणवीरच्या अनोख्या फॅशन सेन्सबद्दल आणि दमदार व्यक्तिमत्त्वाबद्दल प्रश्न विचारले. करण म्हणाला, ‘पण हे सर्व नवीन स्वीकारण्यात सुरुवातीला काही अडचण होती का? ज्यावर रणवीर सिंगने कबूल केले की, “हो, नक्कीच. पण आता आम्ही १० वर्षे एकत्र आहोत. सुरुवातीला त्याला पूर्ण वाटत होतं की हे कोण, हे काय? विशेषतः दीपिकाची आई. खरे सांगायचे तर त्यांना माझ्याबद्दल काय बोलावे तेच कळत नव्हते. आम्ही एकमेकांसमोर मोकळे व्हायला थोडा वेळ घेतला पण आता ती माझ्या आईसारखी आहे. कॉफी विथ करणच्या या नवीन सीझनमध्ये प्रसिद्ध ‘रॅपिड फायर’ व्यतिरिक्त आणखी अनेक नवीन सेगमेंट्स पाहायला मिळतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘सुहागरात साजरी होतंच नाही’, सर्वांसमोर ‘हे’ काय बोलून बसली आलिया भट्ट; व्हिडिओ वेधतोय लक्ष

‘तू काका बनलास, तू मामा बनलास’, बाप बनण्याच्या आनंदात रणबीरने जोडले पॅपराजींशी नाते

‘मनात होती नेहासारखी कोणी, नशीबी आली…’, समीरचा शेफालीसाठी भन्नाट उखाणा

 

हे देखील वाचा