Saturday, June 29, 2024

जेव्हा मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला होता, ‘दीपिका माझ्यासाठी दाल चावलसारखी होती…’

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवत असते. दीपिकाच्या अभिनयाची एक झलक पाहण्यासाठी, दीपिकाशी संबंधित प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दीपिकाचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. तिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.

दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले आहे. या दोघांची जोडी लोकप्रिय असुन, त्यांना बॉलिवूडचे ‘बेस्ट कपल’ म्हटले जाते. मात्र एक काळ असा होता, जेव्हा दीपिका पादुकोणचे नाव अभिनेता रणबीर कपूरसोबत जोडले होते. त्यावेळी दोघेही एकमेकांना डेट करत होते. इतकेच नव्हे, तर दीपिका आणि रणबीरने उघडपणे आपले प्रेम व्यक्त करायचे. दीपिका रणबीरवर इतके प्रेम करायची की, तिने चक्क मानेवर रणबीरच्या नावाचा टॅटू काढला आहे.

दीपिकाने आणि रणवीर नोव्हेंबर 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघांनी इटलीमध्ये लग्नाच्या सात फेऱ्या घेतल्या असुन लग्नानंतर हे जोडपं अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवरचे प्रेमाचा व्यक्त करताना दिसते.

दीपिका माझ्यासाठी ‘दाल चावल’सारखी आहे
रणबीर कपूरने एका मुलाखतीत दीपिकाबद्दल त्याच्या मनातील भावला सांगितल्या होत्या. त्याने सांगितले होते की, दीपिका त्याच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते.  तो म्हणाला होता की, “जेव्हा तुम्ही घराबाहेर असता, तेव्हा तुम्ही सँडविज आणि बर्गरसारख्या गोष्टी खाता. मात्र घरी आल्यावर तुम्हाला केवळ वरण भातच पुरेसा असतो. त्याचप्रमाणे दीपिका माझ्यासाठी आहे. दीपिका माझ्यासाठी घरच्या वरण भातासारखी (दाल चावल) आहे.”

रणबीरने पुढे असेही म्हटले होते की, “दीपिका एक प्रसिध्द स्टार आहे. तिच्यासमोर मी कधीच खोट राहू शकत नाही. ती आज बॉलिवूडच्या लिस्टमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे आणि मी तिचा खूप आदर करतो.”

रणबीरसोबतच्या ब्रेकअपने दीपिका पूर्णपणे तुटून गेली होती. ती अक्षरश: नैराश्यात गेली होती. ज्याच्यातून निघायला तिला बराच वेळ लागला होता. मात्र संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या वेळी तिची भेट रणवीर सिंगसोबत झाली. या चित्रपटाच्या वेळी ते दोघे खूप जवळ आले आणि दोघांनी एकमेकांना जवळपास  6वर्षे डेट केलं. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये लग्नही केलं.(ranveer singh said deepika is like dal and bhata for me)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही…’, जेव्हा करिना कपूर मराठीमध्ये बाेलते

सोनम कपूरच्या नवऱ्याने आनंद अहुजाने शेअर केला मुलगा वायूचा न पाहिलेला क्युट व्हिडिओ

हे देखील वाचा