आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनित धुरंदर हा चित्रपट प्रचंड गाजला. धुरंदर या चित्रपटाचा सिक्वेल आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. आणि धुरंदर 2ने ऍडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली आहे. तर प्रदर्शन नंतर किती कमाई करेल हे पाहण्यासारखे आहे मात्र चहात्यासाठी आता अजून एक सरप्राईज आहे.
धुरंदर या चित्रपटाने सर्वत्र प्रचंड कमाई केली. तर याचे श्रेय संपूर्ण टीमला आणि कलाकारांना जाते. तर धुरंदर या चित्रपटाची लोकप्रियता पाहता धुरंदर 2 चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर 12 मार्च रोजी धुरंदर हा चित्रपट सर्वत्र री रिलीज होत आहे. आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर” हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. धुरंदरचा सिक्वेल 19 मार्च 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे आणि प्रेक्षकांकडून त्याला प्रचंड अपेक्षा आहेत.
जरी “धुरंधर” सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध असला तरी, थिएटरमध्ये त्याचे अॅक्शन आणि मोठ्या प्रमाणात दृश्ये अनुभवणे ही पूर्णपणे वेगळी मज्जा असते. हा चित्रपट केवळ उत्तर अमेरिकेतील अंदाजे 185 स्क्रीन्सवर पुन्हा प्रदर्शित केला जाईल, जो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांची फ्रँचायझीबद्दलची वाढती उत्सुकता दर्शवितो.
जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजच्या बॅनरखाली निर्मित, हा चित्रपट आदित्य धर यांनी स्वतः लिहिलेला, दिग्दर्शित केलेला. तयार केलेला आहे, तर ज्योती देशपांडे,लोकेश धर (Dhar)त्याची सह-निर्मिती करत आहेत. हा हाय-ऑक्टेन स्पाय-अॅक्शन थ्रिलर 19 मार्च रोजी हिंदीमध्ये तसेच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. सिक्वेलचा विकास आणि पहिल्या भागाचे पुनर्प्रकाशन यामुळे “धुरंधर” सध्या मनोरंजन जगतातील सर्वात मोठ्या बातम्यांपैकी एक बनला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धुरंदर 2च्या रिलीज आधी आदित्य धर यांच बर्थडे सेलिब्रेशन, यामी गौतमने शेअर केले फोटो










