बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या नेटफ्लिक्सवरील ‘रणवीर वर्सेस वाइल्ड’ या शोमधून प्रेक्षकांना दिसत आहे. पण या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर रडताना दिसला. त्यानंतर त्याला या शोचा होस्ट बेअर ग्रिल्सने पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले.
रणवीरच्या सांगण्यानुसार तो पत्नी दीपिका पदुकोणसाठी या शोमध्ये आला असून तिच्यासाठी त्याला सर्बिका रमोंडा नावाचं मौल्यवान फूल घ्यायचे आहे. त्यासाठी तो ग्रिल्सबरोबर सार्बियाच्या जंगलाची सफर करत आहे. यात त्याला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. याच अडचणींचा सामना करताना तो भावूक झाला आणि त्याला रडू कोसळले. पण ग्रिल्सने थकल्याने भावूक झालेल्या रणवीरला हिंमत दिली.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)










