Monday, July 1, 2024

अबब! अवघ्या काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी कलाकार घेतात ‘इतके’ मानधन, आकडा पाहून होतील डोळे पांढरे

हिंदी सिने जगतात कलाकारांच्या अभिनयाची जितकी चर्चा होते तितकीच त्यांच्या मानधनाचीही होताना दिसत असते. अभिनयाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कोणता कलाकार किती मानधन घेतो, याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. यामध्ये हिंदी सिने जगतातील प्रमुख कलाकारांच्या मानधनाचा आकडा थक्क करणाराच आहे. चित्रपटांसाठीचे मानधन जास्त असते  हे सर्वांनाच माहित आहे. परंतु हेच कलाकार त्यांच्या दोन तीन मिनिटांच्या जाहीरातीसाठीही भलीमोठी स्विकारताना दिसतात. कोणते आहेत ते कलाकार ज्यांचे जाहिरातीचे मानधन सर्वाधिक आहे, जाणून घेऊया या पोस्टमधून. 

सलमान खान – हिंदी सिने जगताचा भाईजान अशी ओळख असलेला सलमान खान सिने जगतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या चित्रपटांसाठी भलीमोठी रक्कम घेणाऱ्या सलमान खानची जाहिरातीसाठीची फी सुद्धा मोठीच आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सलमान खान त्याच्या एका जाहीरातीसाठी ४ ते १० कोटी पर्यंतच मानधन स्विकारतो.

शाहरुख खान- हिंदी सिने जगताचा किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान त्याच्या अभिनयाइतकाच  मोठ्या मानधनासाठी ओळखला जातो. शाहरुख खान एका जाहिरातीसाठी ५ ते १० कोटी इतके मोठे मानधन घेतो.

रणवीर सिंग – हिंदी सिने जगताचा बाजीराव अशी ओळख असलेल्या रणवीर सिंग त्याच्या अतरंगी स्टाईलसाठी सिने जगतात विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या दमदार अभिनयाची आणि स्टाईलची माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा होताना दिसत असते. आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला रणवीर सिंगही एका जाहीरातीसाठी तब्बल ३ ते ४ कोटी इतके मानधन घेतो.

दीपिका पदुकोण – अभिनेता रणवीर सिंग प्रमाणेच त्याची पत्नी दीपिका पदुकोणही हिंदी सिने जगतातील सर्वात मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी  दीपिका पदुकोणही तिच्या एका जाहिरातीसाठी ७ ते १० कोटी इतकी मोठी रक्कम स्विकारते.

अमिताभ बच्चन – हिंदी सिने जगताचे बादशहा आणि गेली अनेक दशके आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करणारे महानायक अमिताभ बच्चन यांची लोकप्रियताही प्रचंड आहे. अमिताभ बच्चन आपल्या एका जाहिरातीसाठी ३ ते ८ कोटी इतके मानधन घेतात.

प्रियांका चोप्रा – बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिका साकारुन तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच प्रियांकाचा परदेशातही मोठा चाहता वर्ग  आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या एका जाहीरातीसाठी ५ ते १० कोटी इतके मानधन घेते.

आमिर खान – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी जिवतोड मेहनत घेणे हे त्याच्या अभिनयाचे खास वैशिष्ट्य आहे. आमिर खानही आपल्या मोठ्या मानधनासाठी सिने जगतात ओळखला जातो. तो एका जाहीरातीसाठी ५ ते ७ कोटी इतके मोठे मानधन घेतो.

अक्षय कुमार – हिंदी सिने जगताचा मिस्टर खिलाडी म्हणून अभिनेता अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणारा अक्षय कुमार एका जाहीरातीसाठी ८ ते १० कोटी इतके मानधन घेतो.

हे देखील वाचा