दिपीका ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर नाचत होती अन् पायातून रक्त येतं होतं, पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ


बॉलिवूडमधील रोमँटिक जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. याचा प्रत्यय अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रेक्षकांना आला आहे. या गोष्टीला संपूर्ण दुनिया साक्ष आहे की ते दोघे केवळ एकमेकांचे सौंदर्य , प्रेम नव्हे तर अगदी त्यांच्या आयुष्यातील त्यांची मेहनत या सगळ्याची कदर करतात. आजकाल रणवीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो पत्नी दीपिकाच्या मेहनतीबद्दल सांगत आहे.

रणवीर या व्हिडिओमध्ये ‘राम लीला’ या चित्रपटातील दीपिकाच्या मेहनतीबद्दल सांगत आहे की, या चित्रपटात डान्स करताना दीपिकाच्या पायातून रक्त येत होते, तरीही ती डान्स करायची थांबली नाही. दीपिकाने खूप मेहनत घेतली आहे म्हणून ती आज इथे आहे.

तो पुढे म्हणाला,” एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान दीपिका जखमी झाली होती. डान्स करून करून तिच्या तळपायाची त्वचा निघाली होती आणि पायातून रक्त यायला लागले होते. त्यावेळी दीपिकाच्या पायातून एवढे रक्त येत होते की, त्यावेळेस ती जर एखाद्या सर्कसमध्ये गेली असती तर, मागे तिच्या पायाचे निशाण उमटले असते.”

या व्हिडीओमध्ये साफ दिसत आहे की, दीपिकाने तिच्या पायाला पट्टी बांधली आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर सगळे प्रेक्षक दीपिकाचे कौतुक करताना दिसत आहे.

राम लीला या चित्रपटात दीपिका आणि रणवीरने पहिल्यांदाच एकत्र काम केले होतें. या चित्रपटाच्या सेटवरचं या दोघांच्या प्रेमाची सुरूवात झाली. चित्रपटाने खूप यश मिळवले होते. संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाने खूप मेहनत घेतली होती.

राम लीला हा चित्रपटाव्यतिरिक्त ‘बाजीराव मस्तानी’, ‘पदमावत’ या चित्रपटात देखील दीपिका आणि रणवीरने काम केले होते आणि लवकरच हे दोघेही ’83’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.