Monday, July 1, 2024

टॉपचे असे सेलिब्रिटी झाले जे झाले होते डिप्रेशनचे शिकार… किंग खान ते मनिशा कोईराला अशी आहे यादी!

नैराश्य ही अशी गोष्ट आहे जी कधी कुणाला कुठे येईल हे आधीच सांगता येत नाही. बऱ्याचदा अनेक व्यक्ती अचानक नैराश्याचा शिकार होतात. यानंतर ते काय करतात त्यांचं त्यांना ठाऊकच नसतं. त्यांच्या नकळत काही व्यक्ती या जिवाचं बरं वाईट करून घेतात. ज्यापद्धतीने यावर्षी अभिनेता सुशांत सिंह याने नैराश्यात येऊन आत्महत्या केली. अशाचप्रकारच्या आत्महत्त्यांचं प्रमाण हल्ली वाढत चाललं आहे. पण आपल्याला ठाऊक आहे का की आपले आवडते स्टार्स, बॉलिवूड अभिनेते सुद्धा नैराश्याच्या या प्रक्रियेतून गेले आहेत. त्यांनी कशाप्रकारे या सर्व परिस्थितीचा सामना केला आणि हे स्टार्स नेमके कोण आहेत हेच आपण आता जाणून घेणार आहोत.

शाहरुख खान

२०१० मध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख डिप्रेशनचा बळी ठरला होता. स्वत: शाहरुखने याबद्दल सांगितले की, रा-वन चित्रपटानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे तो खूप अस्वस्थ झाला होता, ज्यामुळे तो नेहमी उदास राहत होता. याबद्दल शाहरुख पुढे म्हणाला होता, “खांद्याच्या दुखापतीमुळे आणि त्रासामुळे डिप्रेशन मोडमध्ये गेलो होतो, परंतु आता मी त्यातून बाहेर पडलो आहे. मला आता आनंदी आणि खूप उत्साही वाटतंय.”

अनुष्का शर्मा

आनंदी आणि हसर्‍या स्वभावाची अनुष्का शर्मादेखील नैराश्य ग्रस्त होती. याविषयी ती स्वत: उघडपणे बोलली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्रीने खूप संघर्ष देखील केला आणि शेवटी तीने लढाई जिंकली. अनुष्काने तिच्या वाईट वेळेबद्दल सांगितलं,”मला एंझायटी आहे आणि मी त्याचा सामना करतेय. मी एंझायटीमुळे औषध घेत आहे. मी असं का म्हणतेय? कारण ही एक सामान्य गोष्ट आहे. ही एक नैसर्गिक समस्या आहे. माझ्या कुटुंबातही नैराश्याची अनेक प्रकरणं होऊन गेली आहेत. जास्तीत जास्त लोकांनी याबद्दल खुलेपणाने बोललं पाहिजे. त्यामध्ये लज्जास्पद आणि लपविण्यासारखे काहीही नाही. जर तुम्हाला पोटदुखी असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाता, त्याचप्रमाणे हे खूप सोपं आहे. मला हे माझं मिशन बनवायचं आहे. लोकांना औदासिन्याची लाज वाटू नये यासाठी मला लोकांना शिक्षित करायचे आहे.”

वरूण धवन

२०१५ मध्ये रिलीज झालेल्या बदलापूर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान वरुण धवन नैराश्याशी झुंज देत होता. याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम झाला होता, त्यानंतर वरुणने मानसोपचार तज्ञाची मदत घेतली. याबद्दल वरुण म्हणाला होता, “मी उदास होतो. मला डिप्रेस्ड ​​घोषित केलं गेलं नव्हतो पण मी त्याच मार्गाने जात होतो. काही वेळा तर मी खूप उदास व्हायचो. मला उदासीनता हा शब्द वापरायला आवडणार नाही कारण ती एक गंभीर समस्या आहे. मलाही ती मानसिक समस्या उद्भवली. आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. मी डॉक्टरांचा सल्लाही घेतला. ”

रणवीर सिंह

नेहमीच आनंदी आणि उत्साही असणारा रणवीर सिंगही डिप्रेशनचा बळी ठरला आहे. रणवीरच्या मित्राने सोशल मीडियावर आत्महत्येबद्दल पोस्ट केले होते, त्या व्यक्तीने कुणीही मदत करण्यापूर्वी स्वत: ला गोळी झाडून घेतली होती. यामुळे रणवीरला धक्का बसला होता, त्यानंतर तो निराश झाला होता. रणवीरच्या जवळच्या स्त्रोताने माध्यमांना सांगितलं,”रणवीर आपल्या दुःखद भावना या कधी सार्वजनिक करत नाही पण त्याच्या जवळच्या लोकांना, विशेषत: दीपिकाला याबद्दल माहित आहे. मित्राच्या आत्महत्येमुळे रणवीर खूप नाराज होता. तो त्या मित्राबद्दल काहीही करु शकला नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर ते एक थेरपिस्टलाही भेटले. यावेळी दीपिकाने त्याचं खूप समर्थन केलं होतं.”

करण जोहर

लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरनेही नैराश्याविरोधात दीर्घ लढा दिला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत करणने नैराश्यातून बाहेर पडण्याची कहाणी सांगितली होती. ज्यामुळे त्याच्यासारख्या लोकांना यातून बाहेर पडण्यास मदत होईल. वडील यश यांच्या निधनाचे दुख: करणने सहन करणं आणि आयुष्यात कधीही कोणताही साथीदार त्याच्याप्रमाणे न सापडणं याचा जास्त त्रास देऊ लागललं. करणला त्याच्या थेरपिस्टकडून याबद्दलची माहिती मिळाली.

हृतिक रोशन

Image: instagram/hrithikroshan

एव्हरी डे हिरोज या मोहिमेदरम्यान हृतिक रोशन नैराश्याला बळी पडण्याविषयी बोलला. हृतिकची अशी इच्छा आहे की निराश झालेल्या लोकांनी त्याचा सामना उघडपणे करावा आणि उगाच आयुष्यात त्याचा पेच होऊ नये.

दीपिका पदुकोण

बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेत्री दीपिका पदुकोण ही डिप्रेशनवर उघडपणे बोलणारी पहिली सेलेब्रेटी होती. दीपिकाने बर्‍याच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपल्या औदासिन्याबद्दलही खुलेपणाने सांगितले आहे. यासाठी अभिनेत्री देखील लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन चालवते जी निराश लोकांना मदत करते.

नेहा कक्कर

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिने अभिनेता हिमांश कोहलीशी ब्रेकअप झाल्यानंतर आलेल्या डिप्रेशनबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या नैराश्याविषयी बोलली. सिंगर इंडियन आयडलच्या सेटवर अनेक वेळा रडतानाही दिसली होती. परंतु नंतर तिने असंही म्हटलं होतं की तिच्या नैराश्याचं कारण हे ब्रेकअप नव्हतं.

मनीषा कोईराला

अभिनेत्री मनीषा कोईराला तिच्या लग्नातील अडचणींमुळे बराच काळ ती नैराश्यात होती. नंतर, कुटूंबाच्या मदतीने
तिला पुन्हा आनंदी होण्याची संधी मिळाली.

हे देखील वाचा