Wednesday, July 3, 2024

हनी सिंगला कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कोर्टाने लगावली फटकार; मेडिकल रिपोर्ट अन्…

हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, स्त्री भ्रूणहत्या आणि लैंगिक शोषण या सर्वांमुळे आजही भारतातील महिला असुरक्षित आहेत. कायद्यामध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद आहे. महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. परंतु तरी देखील आजही ग्रामीण भागातील महिला आणि अनेक शहरांमधील महिलांच्या मनामध्ये बाहेर तसेच घरात देखील असुरक्षततेची भावना असते. खरं तर या सर्वांमध्ये सिनेसृष्टी देखील मोठ्या प्रमाणावर बदनाम आहे. नुकतेच संगीतकार यो यो हनी सिंगवर देखील असाच गुन्हा दाखल झाला आहे.

रॅपर हनी सिंगच्या आवाजाने अनेक तरुणांना भुरळ घातली आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व तरुणांच्या ओठांवर त्याचे गाणे हमखास ऐकायला मिळते. परंतु तो आता चांगलाच वादाच्या कचाट्यामध्ये सापडला आहे. त्याच्या बायकोने त्याच्यावर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केला होता. साल २०११ मध्ये हनी सिंगचे शालिनी तलवार बरोबर लग्न झाले होते. सध्या त्याच्या बायकोने केलेल्या आरोपांमुळे तो चिंतेत आहे. (Rapper honey Singh domestic violence case court shout single medical report and income tax return)

शालिनी तलवारने केलेल्या आरोपांमुळे शनिवारी (२८ ऑगस्ट) दिल्लीतील एका कोर्टामध्ये त्याच्यावर सुनावणी होती. परंतु हनी सिंग कोर्टात हजर राहिला नाही. त्यामुळे कोर्टाने त्याला चांगलेच फटकारले आहे. त्याला कोर्टाने पुढच्या तारखेआधी मेडिकल रिपोर्ट आणि इनकम टॅक्स रिटर्न्स कोर्टासमोर सादर करायला सांगितले आहे.

कोर्टाच्या या आदेशावर त्याचा वकील म्हणाला की, “शक्य तितक्या लवकर सर्व काही सादर करू. तसेच पुढच्या तारखेला हनी सिंग नक्की हजर राहील.” तसेच कोर्टाने त्याला पुढील सुनावणीची ३ सप्टेंबेर ही तारीख दिली आहे.

या सर्व प्रकरणावर यो यो हनी सिंगने त्याचे मत देखील स्पष्ट केले आहे. हनी सिंग म्हणाला की, “माझ्या पत्नीने माझ्यावर लावलेले आरोप सर्व खोटे आहेत. मी असे काहीच केलेले नाही. तिच्या अशा वागण्याने मी खूप दुःखी आहे. मी या आधी कधीच जनतेसमोर माझे मत मांडले नव्हते, पण आता या प्रकरणामुळे मांडत आहे.”

शालिनी तलवारने त्याच्या विरोधात ३ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कौटुंबिक अत्याचारापासून महिलांच्या सुरक्षेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या पत्नीने त्याच्याकडे आता १० कोटी रुपयांची मागणी देखील केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट

-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत

निर्मात्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप; तर पत्रिका वाटप होऊनही ‘या’ कारणामुळे मोडले होते शिल्पाचे लग्न

हे देखील वाचा