Monday, July 1, 2024

बादशाह ‘या’ पंजाबी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा, वर्षभरापासून करत आहे डेटिंग !

पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायक बादशाह(Badshah) म्हणजेच आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया पुन्हा एकदा आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. बादशाहचं नाव सध्या पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत जोडलं जात आहे. मागील एक वर्षांपासून बादशाह आणि ईशा एक दुसऱ्यांना डेट करत आहेत. असं म्हटलं जात आहे.

मागील एक वर्षापासून दोघं एकमेकांना करत आहेत डेट
माध्यमाच्या वृत्तानुसार, बादशाह आणि ईशाने आपल्या नात्याबाबत घरच्यांना सांगितलं आहे. असे म्हटले जातंय की, त्या दोघांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. ज्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर हे दोघे एकमेकांना डेट करु लागले. मागील 1 वर्षापासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

दरम्यान, 2012 मध्ये बादशाहनं जॅस्मिनसोबत लग्नगाठ बांधली. 2017 मध्ये जॅस्मिन आई-वडील झाले. त्यांना एक मुलगी झाली. मुलीचं नाव त्यांनी जेसी ग्रेस असं ठेवलं. लॉकडाऊन दरम्यान जॅस्मिन आणि बादशाह यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. 2019 मध्ये बादशाहाने त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला. सध्या त्याची आधीची पत्नी मुलीसोबत लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे. तर बादशाह सध्या मुंबईमध्ये राहत आहे.

ईशा रिखी(Isha Rikhi) पंजाबी अभिनेत्री आणि मॉडल आहे. पंजाबी चित्रपटातून ईशा रिखीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. तिने आत्तापर्यंत ‘जट्ट बॉयज पुट जट्टन दे’, ‘हैप्पी गो लकी’ आणि ‘मेरे यार कमीने’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये बॉलिवूडमधील नवाबजादे चित्रपटातून पदार्पण केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साऊथच नाही, तर कोरिअन चित्रपटांचाही रिमेक करून बसलाय बॉलिवूड, यादीत तुमचाही आवडता सिनेमा
स्वराज्यात सामील व्हा, नाहीतर मरा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा