Monday, July 1, 2024

सुशांत सिंग आत्म’हत्ये प्रकरणी हनी सिंगच माेठं वक्तव्य; म्हणाला, ‘अभिनेत्याचा मृत्यू…’

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली होती, अशातच आता प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने मीडियाशी संवाद साधताना आपले मत मांडले आहे. हनी सांगते की, तो स्वतः एकेकाळी खूप कठीण टप्प्यातून गेला होता. पण तो स्वत:ला भाग्यवान समजतो की, त्यावेळी तो त्याच्या कुटुंबासोबत होता. तर दुसरीकडे, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबद्दल हनी सिंगचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या नुकत्याच झालेल्या आत्महत्येच्या घटनांबद्दल हनी सिंग मोकळेपणाने बोलला. काय आहे रॅपर हनी सिंगच मत? चला जाणून घेऊया…

संवादादरम्यान हनी सिंग (honey singh) याने आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबद्दल आपले मत मांडले आणि म्हणाला, “आत्महत्या करणे हे अत्यंत चुकीचे पाऊल आहे. हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? आतापर्यंत आत्महत्या केलेले सर्व व्यक्ती अनेकदा आपल्या कुटुंबीयांपासून दूर होते आणि त्यानंतरच त्यांनी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलले आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

आपला मुद्दा पुढे करत हनी सिंग म्हणाला, “जेव्हा सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली, तेव्हा तो त्याच्या कुटुंबापासून दूर होता आणि म्हणूनच त्याने आत्महत्या केली. तो त्याच्या कुटुंबाजवळ असता तर त्याने आत्महत्या केली नसती.” हनी सिंग पुढे सांगताे, “कठीण दिवसात मी माझ्या कुटुंबासोबत होतो. म्हणूनच मी आज तुमच्यासमोर उभा आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

हनी सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो 9 वर्षांनंतर त्याचा नवा अल्बम घेऊन येत आहे. या अल्बमचे टायटल हनी 3.0 आहे.

सुशांत सिंग राजपूतचा 2020 मध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करत आहे. मात्र, तरीदेखील एजन्सीने अद्याप या प्रकरणात कोणताही रिपोर्ट दाखल केलेले नाही. (rapper yo yo honey singh said if sushant singh rajput was with his family he would neve committed suicide)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता हा गंध मनात ठेवून…’, सुव्रत जोशीच्या कलाकृतीची निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती

‘दाखवणे बंद करा लोक बोलणे बंद करतील’, उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्या वादावर सुप्रिया सुळे यांचे मत

हे देखील वाचा