Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड आपल्या वडिलांच्या आठवणीत ‘बिग बॉस’मधील ‘हा’ स्पर्धक झाला खूपच भावुक; ढसाढसा रडत म्हणाला, ‘माझे वडील…’

आपल्या वडिलांच्या आठवणीत ‘बिग बॉस’मधील ‘हा’ स्पर्धक झाला खूपच भावुक; ढसाढसा रडत म्हणाला, ‘माझे वडील…’

बिग बॉसच्या ओटीटी पर्वाचा दणक्यात शुभारंभ होऊन १० दिवस झाले आहेत. या शोच्या निमित्ताने करण जोहरने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. करण पहिल्यांदाच या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला आहे. बिग बॉसबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता असते. स्पर्धक, नवीन फॉरमॅट, नवीन वाद, नवीन किस्से आणि अनेक मसालेदार गोष्टी या शोमधून लोकांना पाहायला मिळतात. या शोमध्ये येणारा प्रत्येक स्पर्धक जरी मेकर्सच्या निर्णयामुळे आला असला, तरी त्या स्पर्धकाला शोमध्ये टिकवणे हे केवळ प्रेक्षकांच्या हातात असते.

दरम्यान, शो सुरू असताना बिग बॉसच्या घरात स्पर्धक राकेश बापट वडिलांची आठवणीत खूप भावुक झाला आणि रडू लागला. यादरम्यान त्याच्या डोळ्यातून अश्रूही येत होते. त्याला रडताना पाहून सर्व सहकारी स्पर्धक त्याच्या जवळ आले आणि त्याची समजूत घातली. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक सहजपाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना दिसत आहे. त्यादरम्यान राकेशने त्याला चोख प्रत्युत्तरही दिले, त्यावर त्याचे चाहते खूप फिदा झाले आहेत.

राकेश बापट भावनिक झाल्यानंतर शोमधील वातावरण खूप शांत होते. सर्व स्पर्धक शांत होऊन एकाजागी थांबतात. तेव्हाच राकेश म्हणाला, “माझे वडील मला असे पाहून अजिबात खूश होणार नाहीत.”

राकेशला भावनिक झालेले पाहुण शमिता शेट्टी, रिद्धिमा पंडित आणि करण नाथ यांनी लगेच त्याला धीर दिला आणि त्याला शांत करण्यास मदत केली. दरम्यान, राकेश म्हणाला, “मी लष्करी जवानाचा मुलगा आहे. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की, एखाद्याने नेहमी योग्य गोष्टीसाठी लढले पाहिजे.” तो पुढे म्हणाला, “माझे वडील मला अशा छोट्या गोष्टींवर भांडताना पाहून खूश होणार नाहीत. ते नेहमी म्हणायचे की, तू देशासाठी लढ.”

https://twitter.com/bb_live_feeds/status/1426127800096886790

यावेळी प्रतिकला त्याची चूक कळली आणि त्याने राकेशची माफी मागितली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा