Tuesday, July 9, 2024

Bigg Boss OTT: तुटत चाललंय राकेश अन् शमिताचं बहरलेलं नातं; अभिनेत्री म्हणाली, ‘तो माझ्या लायक नाही’

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांची वाढती जवळीक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांमध्ये आहे. त्यांनी कबूल देखील केले की, दोघांनाही एकमेकांबद्दल भावना आहेत. राकेशने ‘बिग बॉस’च्या घरातील सर्व सदस्यांना सांगितले की, त्याला शमिता आवडते. तर शमितानेही तिची मैत्रीण नेहा भसीनला राकेशवरील तिच्या प्रेमाबद्दल सांगितले. पण गेल्या काही भागांमध्ये आपण पाहिले की, त्यांच्यामध्ये भांडणे चालू आहेत, ज्यामुळे शमिता म्हणाली की राकेश तिच्या लायक नाही.

दिव्या अग्रवालमुळे त्यांच्यात सतत वाद होत आहेत, जे शमिताला आवडत नाहीत. शमिता क्षणभरही दिव्यासोबत उभी राहू शकत नाही, तर राकेश तिला साथ देताना दिसत आहे. यामुळे अनेकदा त्याच्या शमितासोबतच्या नात्यात दुरावा येत आहे. गुरुवारी राकेशने दिव्या आणि शमिता यांच्यातील गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण गोष्टी अधिकच वाईट होत गेल्या. शमिता तिची जवळची मैत्रीण नेहा भसीनसोबत याबद्दल चर्चा करताना दिसली. शमिता म्हणाली की राकेशने तिला सांगितले की, ती आणि दिव्या दोघेही एकमेकांचा अपमान करत आहेत. (raqesh bapat shamita shetty relationship broke down in bigg boss ott said he is not the man)

 

शमिता शेट्टी नेहा भसीनला म्हणाली की, राकेश तिच्यासाठी योग्य माणूस नाही, कारण तो तिच्यासाठी भूमिका घेऊ शकत नाही. ती नेहा आणि प्रतीक सहजपाल यांना म्हणाली की, जर ती पुन्हा राकेशच्या जवळ जाऊ लागली तर तिला थांबवा. राकेश बापट सेमीफाइनलमध्ये पोहोचला आहे, पण आता त्याच्या आणि शमिता शेट्टीच्या बाँडिंगमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. दोघांमधील संभाषणही थांबले आहे. दोघांनाही निश्चितपणे त्यांच्यातील समस्या सोडवायच्या होत्या, पण गुरुवारच्या एपिसोडमध्ये तिकीट टू फिनाले टास्कनंतर दोघांमधील भांडण आणखी वाढले आहे.
शोमध्ये राकेश बापट नेहा भसीनला म्हणतो की, “शमिता दु:खी आहे, तिला सांग की मला तिला त्रास द्यायचा नाही. तिला अस्वस्थतेची समस्या आहे आणि मला त्याचे कारण व्हायचे नाही. मला तिला दु:खी करायचे नाही.” त्यानंतर दोघेही बसून एकमेकांशी बोलतात, परंतु ते कोणत्याही निराकरणापर्यंत पोहोचत नाहीत.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

-‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर एका चाहतीच्या वागण्यामुळे, ‘बिग बीं’चे वैवाहिक जीवन आले धोक्यात

प्रार्थना बेहेरेच्याही घरी झाले बाप्पाचे दणक्यात स्वागत, वक्रतुंडाची आराधना करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा