Tuesday, July 9, 2024

काय सांगता! शोमध्ये शमिता शेट्टीला लग्नासाठी प्रपोज करणार राकेश बापट? जाणून घ्या पूर्ण प्लॅन

प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. मारामारीपासून रोमान्स आणि मैत्रीपर्यंत, हा शो ड्रामा आणि मनोरंजनांनी परिपूर्ण ठरला आहे. असे अनेक स्पर्धक आहेत, जे अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. त्यातच आता राकेश बापटने शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टीची जवळीक चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता राकेश शोमध्ये शमिताला प्रपोज करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर राकेशने कशी प्रतिक्रिया दिली हे जाणून घेऊयात…

खरं तर ‘बिग बॉस १५’ या रियॅलिटी शोमध्ये शमिता शेट्टीला लग्नासाठी प्रपोज करणार नसल्याचे, राकेश बापटने म्हटले आहे. शमिता या शोमध्ये स्पर्धक म्हणून उपस्थित आहे, तर राकेश गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सामील झाला. ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रवेश करण्यापूर्वी एका वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश बापट म्हणाला की, “मी शमिताला कधीही नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नासाठी प्रपोज करणार नाही. ती आमच्यासाठी एक वैयक्तिक भावना आहे. जेव्हा हे घडेल तेव्हा ते शोच्या बाहेर घडेल, शोमध्ये नाही. हा आमच्यासाठी खूप खास क्षण असणार आहे.” (raqesh bapat will not propose marriage to shamita shetty in bigg boss 15 house)

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी राकेश बापटने एका निवेदनात म्हटले होते की, या रियॅलिटी शोमध्ये जाण्याचे कारण शमिताच आहे. तो म्हणाला, “प्रेम… एक असा शब्द आहे ज्याला खूप अर्थ आहे. मी शोमध्ये परत यावे यासाठी सतत मेसेज करणाऱ्या प्रेक्षकांचे, ट्वीट करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रेम चुंबकासारखे काम करत आहे. आणि हो, शमिता मला ओटीटी सीझनमध्ये या प्रवासादरम्यान सापडली आणि मी तिच्यासोबत पुन्हा एकदा बिग बॉसच्या विचित्र घरात वेळ घालवण्यास उत्सुक आहे.”

दुसरीकडे वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून शोमध्ये अधिक रंजकता आलेली पाहायला मिळत आहे. अशात आता पुढे काय काय ट्विस्ट येतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा