बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यांचे वाद होतात हे खरे आहे. परंतु तिथे अनेकांची मने जुळतात आणि नाती तयार होतात हेही तितकेच खरे आहे. या घरामध्ये अनेक दिवस एकमेकांबरोबर राहून, वेगवेगळे टास्क पार करून तेथील काही लोकांबद्दल मनात वाईट जागा निर्माण होते, तर काहींविषयी आपुलकी निर्माण होते. अशात सध्या बिग बॉसमधील राकेश बापट आणि शमिता शेट्टीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
राज कुंद्राच्या प्रकरणानंतर बिग बॉस ओटीटीमध्ये शमिताला पाहून सर्व स्पर्धकांना राग आला होता. तिच्यावर त्यांनी खूप टीका केली होती. परंतु तिने या सर्वांकडे दुर्लक्ष करत सुरुवातीपासूनच राकेशबरोबर कनेक्शन चांगले ठेवले. कनेक्शन टास्कनंतर देखील ते एकमेकांच्या जवळ आहेत. दोघेही एकमेकांना आपले सुख दुःख सांगत असतात. त्यांच्यामध्ये असलेली जवळीकच आता चर्चेचा विषय बनली आहे. (Raqesh opens up to Shamita about his divorce with ridhi Dogra)
काही दिवसांपूर्वी राकेशने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शमिता बरोबर एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये तो तिला अगदी प्रेमाने सकाळी झोपेतून उठवताना दिसत होता. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली. त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा देखील वर्षाव केला. अनेकांनी हार्टचे इमोजीही कमेंट केले होते.
राकेश शर्माने बिग बॉसच्या घरामध्ये शमिताजवळ आपले मन मोकळे केले आहे. तो तिला सांगत होता की, “मी माझ्या आयुष्यामध्ये खूप तणावपूर्ण परिस्थिती पाहिली आहे. माझे वडील वारले आणि माझी पत्नी रिद्धी डोगरा मला सोडून गेली. तिने मला घटस्फोट दिला. या घटनेमुळे मी पूर्ण खचलो होतो. माझी मानसिक स्थिती खालावली होती. तसेच मी आजारी पडलेलो आणि २ आठवडे मला झोपच लागली नव्हती”.
आपलं आयुष्य आणि त्यात आलेले चढ- उतार त्याने शमिताला सांगितले. या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याने, ते सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेत असतात. कनेक्शन टास्कवेळी शमिताबरोबर हार्ट कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर राकेश शमिताला म्हणाला, “एक कनेक्शन बनलं आहे आपलं. आज आपण दोघे एकमेकांना इतके जवळून ओळखत आहोत. आताच आपण अशा लेव्हलवर पोहोचलो आहोत, जिथे आपण एकमेकांना समजून घेतो. तुझ्याबरोबर एक आपलेपणाचे नाते तयार झाले आहे.”
शमिता आणि राकेशमधील जवळीक वाढत चालली आहे. राकेश तिने ओरडल्यावर देखील शांतपणे तिचे म्हणणे ऐकून घेतो. शमितासुद्धा त्याला ओरडल्यानंतर सर्वकाही नीट समजावून सांगते. त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत आहेत. काही चाहत्यांनी त्यांना असा प्रश्न विचारला आहे की, “बिग बॉसच्या घरातून तुम्ही दोघे लग्न करूनच बाहेर पडणार आहात का?”
या दोघांची जोडी बिग बॉसच्या प्रेक्षकांना देखील खूप आवडते. सुरुवातीपासून हे दोघे एकत्र टास्क खेळत असल्याने त्याच्यातील जवळीक वाढली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण
-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’
-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा