अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, २ सप्टेंबरचा दिवस सर्व चाहत्यांसाठी दुःखाचा दिवस म्हणून उजाडला. अनेक चाहत्यांनी त्यांचा आवडता तारा गमावला. एका आईने आपला मुलगा गमावला. तर मित्रांनी त्यांचा जिवलग मित्र गमावला आहे. सिद्धार्थ आरोग्याबद्दल खूप जागरूक होता. अशाप्रकारे त्याचा जीव जाईल अशी कोणालाही कल्पना नव्हती. सिद्धार्थच्या शेवटच्या प्रवासात त्याचे सर्व जवळचे लोक तिथे पोहोचले होते. अगदी रश्मी देसाई सुध्दा सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली होती.
रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला यांची ‘बिग बॉस’च्या घरात खूप भांडणे झाली होती. दोघांनीही एकमेकांना खूप काही सुनावलं होतं. एकदा रश्मी रागात सिद्धार्थला म्हणाली होती की, “तु मेला तरी मी तुला पाणी देणार नाही.” मात्र, आज रश्मीला तिच्या बोलण्याचा पश्चाताप होत असावा. ती तिच्या अंतःकरणात स्वतःलाच शाप देत असावी. कारण आता तिला तिच्या हृदयाची कटुता दूर करायची असली, तरी ती सिद्धार्थशी बोलू शकत नाही.
रश्मी देसाईने सिद्धार्थसोबत कलर्स टीव्ही सीरियल ‘दिल से दिल तक’ मध्ये काम केले. या शोमध्ये दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात रश्मी आणि सिद्धार्थ यांच्यात जबरदस्त बॉण्डिंग होते. असे म्हटले जाते की, मालिकेत पती -पत्नीची भूमिका साकारताना दोघे खर्या आयुष्यातही जवळ येत होते. पण हे नातेसंबंध फार काळ टिकले नाहीत. काही काळानंतर त्यांच्या नात्यात कटुता येऊ लागली आणि नंतर सिद्धार्थने शो सोडला.
रश्मी आणि सिद्धार्थची पुढची भेट ‘बिग बॉस १३’ दरम्यान झाली. पहिल्या दिवसापासून रश्मी आणि सिद्धार्थ यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा दाखवला गेला. ‘बिग बॉस’च्या घरातच रश्मीने खुलासा केला होता की, सिद्धार्थने तिला ‘दिल से दिल तक’ शोमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. खाण्यावरूनही दोघांमध्ये भांडणं झाली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’
-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज