Wednesday, July 3, 2024

टेलिव्हिजनवरील ‘संस्कारी सून’ दिसली बोल्ड अवतारात, रश्मीचे बिकिनी फोटो पाहून कलाकारही म्हणतायत, ‘ओहो उफ्फ’

आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याकारणाने तिचा फॅन फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या हॉट फोटोमुळे ती सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनत असते. तसेच तिला सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल देखील केले जाते. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा हॉट लूकमधील फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

रश्मीने मालदीव व्हेकेशनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती फ्लोटिंग नाश्ता करताना दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, रश्मीने पांढऱ्या रंगाचा बिकिनी टॉप आणि पांढऱ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. यामध्ये ती समुद्राच्या पाण्यात वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. आणखी एका फोटोमध्ये तिने सनग्लासेस लावलेले दिसत आहेत. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना नेहमी प्रमाणेच खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मालदीवमधील हा बोल्ड आणि हॉट लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. (Rashmi Desai shared her bold bikini photos from Maldives vacation)

तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “हॉट.” तसेच नकुल मेहता याने कमेंट केली आहे की, “खाऊन घे यार, नाश्ता थंड होईल.” तसेच मोनालिसा हिने “ओहो उफ्फ,” अशी कमेंट केली आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

रश्मीने २००६ साली ‘रावण’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. तसेच ‘ये लमहे जुदाई के’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने ‘उतरण’, ‘दिल से दिल तक’, ‘नागीन ४’, ‘भाग्य का जहरीला खेल’, या मालिकांमध्ये काम केले आहे. या व्यतिरिक्त ती अनेक रियॅलिटी शोमध्ये देखील स्पर्धक होती. तिने ‘जरा नच के दिखा’, ‘झलक दिख ला जा’, ‘खतरों के खिलाडी’, ‘नच बलिये’, ‘बिग बॉस १३’ यामध्ये भाग घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहिदने बेडरूममधील फोटो केला शेअर, पाहून पत्नी मीरा म्हणाली, ‘तू स्वत:ला संकटात टाकत आहेस, तो व्हिडिओ…’

-रोमँटिक अंदाजात पोझ देत होते अक्षय अन् कॅटरिना, कपिल शर्मा बनला ‘कबाब में हड्डी’

-सोनम कपूर ते करीना कपूरपर्यंत अनेक अभिनेत्रींना आवडतात मसाबाने डिझाईन केलेले कपडे, पाहा तिची स्टाईल

हे देखील वाचा