Saturday, June 29, 2024

एकदम कडक! ‘टॉप टकर’ गाण्यावर थिरकली ‘नॅशनल क्रश’, वाढदिवसानिमित्त व्हिडिओची सोशल मीडियावर धमाल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, तरुणवर्ग तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणून संबोधतात. लाखो तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचा सोमवारी (5 एप्रिल) वाढदिवस आहे.

रश्मिका तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत, सर्वजण तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. रश्मिका मंदानाला माध्यमांद्वारे ‘कर्नाटकची क्रश’ म्हटले जात होते, पण नंतर ती ‘नॅशनल क्रश’ बनली. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ‘टॉप टकर’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिकाची स्टाईल खरोखरच अप्रतिम दिसत आहे. आता चाहतेही तिचे खूप कौतुक करत आहेत.

रश्मिका मंदानाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, जो आतापर्यंत 27 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री धमाकेदार स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे. तिच्या एक्सप्रेशन्स पासून ते स्टेप्सपर्यंत सर्व अगदी पाहण्यासारखे आहे.

हा व्हिडिओ शेअर करत रश्मिकाने लिहिले, “कारण का नाही” (Because why not). एका युजरने अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर ‘शानदार’ लिहिले आहे, तर दुसऱ्याने ‘गॉर्जियस मॅम,’ असे लिहिले. याशिवाय तिच्या व्हिडिओवर अनेक चाहते फायर इमोजी पोस्ट करून प्रतिक्रिया देत आहेत.

रश्मिका मंदानाने तमिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांच्या माध्यमातून तिची जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. ती तिच्या ‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष ओळखली जाते. पण आता ती लवकरच बॉलिवूड विश्वात प्रवेश करणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. इतकेच नाही तर ती ‘गुड बाय’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! करण जोहरने लावले कंगना रणौतच्या ‘या’ गाण्यावर ठुमके, व्हिडिओ रिट्विट करत अभिनेत्री म्हणाली…

-‘अरे कोणी तरी अग्निशमन दलाला बोलवा…’, ‘दिल बेचारा’ फेम अभिनेत्री संजना सांघीचे हॉट फोटोशूट पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-‘लाखो दिलों की धडकन!’ रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील ‘ते’ सत्य, जे कोणालाही माहित नाही; सुंदर हास्यामागे आहेत बऱ्याच वेदना

हे देखील वाचा