Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड चाहत्यांसाठी खुशखबर! कार्तिक आर्यन आणि रश्मिकाची जोडी करणार एकत्र काम

चाहत्यांसाठी खुशखबर! कार्तिक आर्यन आणि रश्मिकाची जोडी करणार एकत्र काम

रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रश्मिकाचा पुष्पा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील तिच्या सहजसुंदर अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. लवकरच या चित्रपटाचा दुसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी रश्मिका आणि कार्तिक आर्यन एकत्र झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोणता आहे त्यांचा आगामी चित्रपट चला जाणून घेऊ. 

लोकप्रिय दक्षिणात्य अभिनेत्रींपैकी एक रश्मिका मंदान्ना सतत चर्चेत असते. पुष्पा नंतर तिची लोकप्रियता खूप वाढली आहे, तर आता निर्मात्यांनी देखील ‘पुष्पा 2’ ची अधिकृत घोषणा केली आहे. दरम्यान, रश्मिका मंदान्ना अभिनेता कार्तिक आर्यन एकत्र दिसली होती. रिपोर्टनुसार, दोन्ही कलाकार एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि कार्तिक आर्यन हे दोघेही सध्या चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहेत. रिपोर्टनुसार, दोघांची जोडी एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहे. सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दोघांना वर्सोवा जेट्टीवर एकत्र जाताना दिसले, जिथे रश्मिका गुंफलेल्या टी-शर्टमध्ये होती, तर कार्तिक आर्यन निळ्या जीन्स आणि काळ्या टी-शर्टमध्ये दिसत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही शूटिंगसाठी एकत्र आले होते.

दरम्यान, रश्मिका आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्याकडे एक नाही तर तीन चित्रपट आहेत. अभिनेत्री रश्मिका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात आणि रणबीर कपूरसोबत ‘अनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

हेही वाचा – फरहान शिबानी होणार आई बाबा? व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा
‘वडापाव कोणेकाळी आधार होता’, अमोल कोल्हेंना आठवला संघर्षाचा काळ
परिस्थिती वाईट! पाकिस्तानचा दिग्गज गायक झाला बेघर, मुलाबाळांसह राहतोय रस्त्यावर

हे देखील वाचा