कलाकार नेहमीच आपले लहानपणीचे फोटो शेअर करून लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात. त्यांचे लहानपणीचे फोटो पाहून त्यांना ओळखणे कधी कधी खूपच कठीण होते. यामध्ये ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचाही समावेश होतो. रश्मिकाने दक्षिणेकडील चित्रपटांत धमाल केल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासही सज्ज झाली आहे. तिच्याकडे एक नाही, तर दोन बॉलिवूड चित्रपट आहेत. ज्याच्या शूटिंगमध्ये ती सध्या गुंतलेली आहे. रश्मिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी तिचे क्यूट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते. हे फोटो पाहून तिचे चाहते नेहमी तिच्यावर फिदा होताना दिसतात.
रश्मिकाचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. आपल्या अदांनी सर्वांची मने जिंकणाऱ्या रश्मिकाने नुकताच तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती इतकी गोंडस दिसत आहे की, कोणीचीही नजर तिच्यावरून हटू शकणार नाही.
रश्मिकाने हा गोड फोटो शेअर केला आणि लिहिले, “प्रिय कोरोना जाण्याची वाट पाहत आहे.” या फोटोला २६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक सेलेब्स आणि रश्मिकाचे चाहते या फोटोवर कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “हा खरोखरच एक गोंडस फोटो आहे.”
शेअर केला होता फुलांसोबतचा फोटो
रश्मिकाने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती फुलांसोबत पोझ देत होती. सोबतच आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “फ्लॉवर, फ्लॉवर फ्लॉवर…थोड्या सकारात्मकतेसह काही फुले हवेत… आनंद… आशा आणि प्रेमाने भरलेला?”
अफेअरबद्दल बोलली असे
रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच येत असतात. दोघेही या बातम्यांना चुकीचे ठरवत, एकमेकांना चांगले मित्र म्हणून सांगतात. तसेच विजय आणि रश्मिका बर्याचदा एकत्रही दिसतात.
या चित्रपटांत दिसणार अभिनेत्री
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रश्मिका अल्लू अर्जुन सोबत ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा अल्लू अर्जुनचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे रश्मिका बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याशिवाय रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘गुडबाय’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’
-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा










