रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेजण साउथ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. तर या दोघांनी 26 फेब्रुवारी रोजी लग्न केले. हे लग्न उदयपूर मध्ये परिवार आणि मित्र यांच्या उपस्थितीत पार पडली नंतर चित्रपट सृष्टीतील सहकलाकारांना रिसेप्शन देण्यात आले होते मात्र सध्या या जोडप्याच्या एका छोट्या चाहतीने एक तक्रार केली आहे ती म्हणजे ज्यात तिने लग्नाला आमंत्रित न केल्याबद्दल गोडपणे तक्रार केली होती. आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. तर आता रश्मिका व विजय दोघांनीही तिला पार्टी देण्याचे वचन दिले.
‘उर्स लकी थल्ली’ नावाचे चॅनल आहे. 8 मार्च रोजी, या लहान मुलीने रश्मिका आणि विजय यांना त्यांच्या लग्नाबद्दल अभिनंदन करणारा एक व्हिडिओ बनवला. तिने लग्नाला आमंत्रित न केल्याबद्दल एक गोड तक्रारही केली होती. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा तो रश्मिकापर्यंत पोहोचला. यानंतर, या स्टार कपलने त्या लहान मुलीला जेवणासाठी आपल्या घरी आमंत्रित केले. या घटनेचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे, ज्यामध्ये रश्मिका आपल्या लहान चाहतीला लाडू खाऊ घालताना दिसत आहे. विजय देखील आपल्या चाहतीला मांडीवर घेऊन खेळताना दिसत आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय (viajy)देवरकोंडा या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रश्मिका बॉलिवूडमध्येही तिने उत्तम काम केले आहे. तर या जोडीने 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी लग्न केले. आता रश्मिका देखील लग्नानंतर चित्रपटाच्या सेटवर परतली आहे. तर तिने नुकताच एक फोटो शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










