Monday, July 1, 2024

तब्बल ९०० किमीचा प्रवास करून आला होता रश्मिका मंदानाचा चाहता; अभिनेत्रीने व्यक्त केली भेट न झाल्याची खंत

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आणि नॅशनल क्रश नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. ती तिच्या अभिनयामुळे जेवढी लोकप्रिय आहे, तेवढीच ती तिच्या लूक्समुळे देखील लोकप्रिय आहे. त्यामुळे तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखले जाते. अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. तिचे चाहते तिला भेटण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करतात. रश्मिका देखील तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम करते. ती नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्याशी जोडून असते. नुकतेच तिच्या एका चाहत्याचा वेडेपणा खूप चर्चेत आला आहे.

रश्मिका मंदानाने काल (२७ जून) रोजी ट्विटरवर अशी माहिती दिली की, तिचा एक चाहता तिला भेटण्यासाठी ९०० किमी लांबून आला होता. माध्यमातील वृत्तानुसार, मागच्या आठवड्यात रश्मिकाचा आकाश त्रिपाठी नावाचा चाहता तेलंगणामधून कर्नाटकला तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्याने ट्रेन आणि ऑटोने हा प्रवास केला होता. जेव्हा त्याने लोकांना रश्मिकाच्या घरी जाण्याचा रस्ता विचारला, तेव्हा लोकांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी पोलिसात त्याची तक्रार केली. जेव्हा पोलिसांनी आकाश सोबत संवाद साधला तेव्हा त्यांना समजले की, त्याला रश्मिकाला भेटायचे आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला समजावले आणि परत त्याच्या घरी पाठवले.

रश्मिकाला नुकतेच तिच्या या चाहत्याबद्दल माहिती मिळाली आहे. तेव्हा तिने ट्विटरवर सर्वांना याबाबत सांगितले. तिने लिहिले की, “मित्रांनो मला याबाबत आताच माहिती मिळाली आहे. तुमच्या मधील कोणीतरी खूप लांबचा प्रवास करून मला भेटण्यासाठी माझ्या घरी आला होता. पण माझी विनंती आहे की, असं करू नका. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटत आहे की, मी भेटू शकले नाही. मला आशा आहे की, लवकरच आपली भेट होईल. पण आता तुम्ही इथेच सोशल मीडियावर तुमचे प्रेम दाखवा. मला त्यातच आनंद होईल.”

रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत मुंबईमध्ये ‘मिशन मजनू’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. यासोबत ती लवकरच अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ या चित्रपटात देखील काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंटरनेटवर धमाल करतेय ‘ही’ दयाबेन; व्हिडिओ पाहून चक्रावले सोशल मीडिया युजर्स

-ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर विवेकने एका मंत्र्याच्या मुलीसोबत थाटला संसार; आज जगतोय सुखी आयुष्य

-चिमुकल्या ‘आनंदी’ची निरागसता पाहून प्रेक्षकांचे हरपले भान; ‘बालिका वधू २’चा प्रोमो झाला रिलीझ

हे देखील वाचा