रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. हे दोघेजण आता लग्नबंधनात अडकले आहेत, तर त्यांच्या या लग्नाला त्यांनी एक नाव दिले होते ते म्हणजे “विरोश”. तर वेडिंगच ठिकाण अगदी शाही पद्धतीचं होत उदयपूरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हे ठिकाण होत. तर रश्मिका आणि विजय यांनी मंगळवारी हैदराबादमध्ये चाहत्यांच्या मेजवानीचे आयोजन केले होते. या समारंभाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे जोडपे एकमेकांना स्वतःच्या हातांनी जेवण देताना दिसत आहे.
दक्षिणेचा सुपरस्टार विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, ज्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. विजय आणि रश्मिका यांनी सुपरहिट चित्रपट देखील दिले आहेत. आठ वर्षांपासून ते जवळचे मित्र आहेत. 2018 मध्ये आलेल्या गीता गोविंदम या चित्रपटात त्यांची जोडी सुपरहिट झाली. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही मित्र बनले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. ते जवळजवळ तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. आता, 28 फेब्रुवारी 2026 रोजी लग्न करून त्यांनी एकत्र नवीन आयुष्य सुरू केले आहे.
रश्मिका आणि विजय (Vijay)यांनी उदयपूरमध्ये चित्रपटातील कलाकारांप्रमाणेच लग्न केले. लग्नाला फक्त त्यांचे कुटुंब आणि काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. हा समारंभ काही लोकांपुरता मर्यादित होता आणि लग्नानंतर लगेचच सोशल मीडियावर फोटो शेअर करून याची घोषणा करण्यात आली. लग्नानंतर, दोघे घरी परतले. आणि त्यांच्या विधींना सुरुवात केली. मंगळवारी चाहत्यांसह एक उत्सव झाला. तर आज, 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये एक भव्य स्वागत समारंभ होणार आहे. या स्वागत समारंभाला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील तारे, काही राजकीय व्यक्ती उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अभिनेता अक्षय कुमारची भुताटकीवाली होळी, हटके अंदाजात दिल्या होळीच्या शुभेच्छा










