Monday, July 15, 2024

ओटीटी प्लॅटफॉर्मची क्वीन म्हणून ओळखली जाते रसिका दुग्गल, अनेक गाजलेल्या वेबसीरिजमध्ये केलंय तिने काम

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रचंड लोकप्रिय ठरलेली वेबसीरिज म्हणजे ‘मिर्झापुर’. या वेबसीरिजमध्ये सगळ्यात भाव खाऊन गेलेली भूमिका ठरली ती बिना त्रिपाठीची. याच वेबसीरिजमधून बिना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या रसिका दुग्गलला (Rasika Dugal) प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्या कसदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. रसिका दुग्गलला ओटीटी प्लॅटफॉर्मची क्वीन म्हणुन ओळखले जाते. अनेक प्रसिद्ध वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. ‘मिर्झापुर’पासून ‘आउट ऑफ लव्ह’सारख्या अनेक गाजलेल्या वेबसीरिजमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सोमवारी (१७ जानेवारी) अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या अभिनय कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल…

आपल्या सौंदर्याने आणि कसदार अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या रसिका दुग्गलचा जन्म १७ जानेवारी १९८५ मध्ये जमशेदपूर येथे झाला. तिचे पती मुकुल चड्डासुद्धा अभिनेते असुन दोघांनी २०१० मध्ये एकमेकांना लग्नगाठ बांधली. आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या यशस्वी कारकिर्दीला रसिकाने TVF च्या ‘Humorously yours’ या वेबसीरिजमधून सुरुवात केली होती.

परंतु तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती ‘मिर्झापुर’मधील बिना त्रिपीठीच्या भूमिकेने. ऍमेझॉन प्राइमवर रिलीझ झालेल्या या वेबसीरिजमध्ये रसिकाने पंकज त्रिपाठीच्या पत्नीची म्हणजे बिना त्रिपाठीची भूमिका साकारली होती. यामध्ये तिच्या धीरगंभीर आणि ऐटबाज अभिनयाने ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली. इथूनच रसिकाला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही, एकापेक्षा एक दमदार वेबसीरिजमध्ये तिने काम केले.

‘मिर्झापूर’नंतर रसिकाने दिल्ली ‘क्राइम २’, ‘आउट ऑफ लव्ह’, ‘मेड इन हेवन’, ‘लूटकेस’, ‘ए सूटेबल बॉय’ सारख्या भन्नाट वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. यामध्ये नेटफ्लिक्सवरील ‘दिल्ली क्राइम २’ मधील तिची पोलिस अधिकाऱ्याची तर, ‘आउट ऑफ लव्ह’मधील डॉक्टरच्या भूमिकेचेही सर्वत्र कौतुक झाले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा